मुख्यमंत्री धर्मजागरण यात्रा उत्साहात संपन्न …!

हिंदू सणांचा अपमान करणाऱ्या राजकीय पक्षांवर बहिष्कार टाका – अक्षयमहाराज भोसले..
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. ९ ऑक्टोंबर – आगामी निवडणूकी डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक वाडी वस्तीवर कीर्तनकार व निरूपणकार यांच्या माध्यमातून प्रबोधन केले जाणार आहे. जे आमच्या देवी देवतांचा अपमान करतात अशा राजकीय पक्षांवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार शिवसेना संलग्नित धर्मवीर अध्यात्मिक सेना प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित धर्मसभेत केला.
ते पुढे म्हणाले, लोक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण, लाडका भाऊ, वयोश्री योजना, लेक लखपती योजना, तीर्थदर्शन योजना, आरोग्य साह्यता मदत व गोमाते विषयीचे महत्वपूर्ण निर्णय अशा शेकडो योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे भविष्य उज्वल करू पाहणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम अधोरेखित केले. कोल्हापूर येथून प्रारंभ झालेली सदर यात्रा सातारा, नांदेड, लातूर असा प्रवास करत सोलापूर येथे पोहचली आहे.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेने व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे , विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उद्योगमंत्री उदय सामंत शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री धर्मजागरण यात्रे अंतर्गत सोलापूर शहरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना प्रदेशाध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांच्या नेतृत्वात भव्य संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहर व जिल्ह्यातील प्रमुख कीर्तनकार, साधू संत अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत माता भगिनींची विशेष उपस्थिती होती. तत्पूर्वी या धर्म जागरण.सभेचे आयोजन सोलापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख मनिष काळजे, अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी केले होते.
प्रारंभी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुरु झालेल्या सकल लोककल्याणकारी योजनांची यावेळी माहिती देण्यात आली. राजसत्ता व धर्मसत्ता यांचा अनुबंध यांचे महत्व यावेळी विषद केले गेले. यावेळी श्री बसवारूढ मठाचे मठाधिपती शिवपुत्रमहास्वामी, ह.भ.प.भागवत महाराज चवरे, ह.भ.प. मारुती महाराज, शिवसेनेचे महेश चिवटे सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे आदींसह सोलापूर शहर जिल्ह्यातील वारकरी संत महात्मे उपस्थित होते.
वारकऱ्यांचा मुख्यमंत्री मिळाला भाग्य लागते.
दक्षिणकाशी म्हणून ओळखले जाणाऱ्या तीर्थक्षेत्र पंढरपूर मधील आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी मातेचे श्रद्धास्थान सर्वत्र आहे. महाराष्ट्र राज्याला साधुसंताची आणि सवारकरी संप्रदायाची वैभवशाली परंपरा आहे. ही परंपरा कायम टिकून राहण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सदैव तत्पर असून वारकऱ्यांना वारकरी मुख्यमंत्री मिळाला आहे. हे विशेष असून यासाठी चांगले भाग्य लागते. मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून पुढाकार घेत वारकरी संप्रदायासाठी कामे सुरू केली आहेत. आषाढी वारी मध्ये ते स्वतः येऊन वारकऱ्यांची विचारपूस करतात. यापूर्वी कोणताही मुख्यमंत्री अशा पद्धतीने कामकाज केले नाही. त्यामुळे धर्म टिकवण्यासाठी संप्रदाय टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत हीच विठ्ठल चरणी प्रार्थना.
– मनीष काळजे, जिल्हाप्रमुख शिवसेना सोलापूर.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाभारतातील धर्मराज
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाभारतातील धर्मराजाप्रमाणे कार्य करीत आहेत. राज्यात धर्माचे सरकार आहे. धर्माला महत्त्व टिकून आहे. पाच पांडवातील धर्मराज प्रमाणे एकनाथ शिंदे सरकार चालवत होत आहेत.
– श्री शिवपुत्र आप्पाजी महाराज, श्री बसवारूढ मठ संस्थान
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम वाखाण्याजोगे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हापासून मुख्यमंत्री या पदावर कार्यरत आहेत तेव्हापासून त्यांना वारकरी संप्रदायाबद्दल आत्मीय आदर भावना आहे. वर्षा बंगला असू देत किंवा मंत्रालय असू देत प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्याकडून वारकरी संप्रदायातील प्रत्येक वारकऱ्यांना आदरतिथ्य मिळते. ६५ एकर वाळवंट प्रश्न आणि पंढरपूर दिंडी निधी यानंतर आता तीऱ्हे मार्गे पंढरपूर हा भक्तिमार्ग म्हणून घोषित करण्यासाठी आम्ही पत्र दिले आहे. त्यावर लवकर निर्णय घेण्यात येईल.
– ह.भ.प सुधाकर महाराज इंगळे, अखिल भारतीय वारकरी मंडळ.
मुख्यमंत्री सन्मानपत्र वितरण
धार्मिक, आध्यात्मिक, वारकरी संप्रदाय अशा धर्म क्षेत्रात कार्य करणाऱ्या साधुसंत तसेच वारकऱ्यांना मुख्यमंत्री कार्यालयाकडून मुख्यमंत्री सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी हुतात्मा स्मृती मंदिर येथे धर्मजागरण सभेनंतर हा कार्यक्रम संपन्न झाला. शहर व जिल्ह्यातील असंख्य वारकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.