ड्रेनेज लाईन कामामुळे पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल-किसन जाधव
प्रभाग २२ येथील धोंडीबा वस्ती येथे ड्रेनेज लाईन कामाचे उद्घाटन…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२६
सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २२ मधील धोंडीबा वस्ती येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत सन २०२४-२५ आर्थिक वर्षांतर्गत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष सहकार्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून २४ लाख ७५ हजार १०९ रु. खर्चून नवीन ड्रेनेज लाईन कामाचे उद्घाटन करण्यात आले.
दरम्यान, प्रभाग क्रमांक २२ मधील विकास कामांचा एक भाग म्हणून धोंडीबा वस्ती येथील नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यात येत आहे. या कामामुळे या भागातील नागरिकांची अनेक वर्षापासून ची ड्रेनेजची समस्या दूर होणार आहे. या ड्रेनेज लाईन कामामुळे पावसाळ्यात साचणारा पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल, परिसरातील स्वच्छता आणि आरोग्य अबाधित राहील. हे काम प्रभागाच्या विकास कामांचा एक भाग आहे. असे मनोगत यावेळी माजी नगरसेवक किसन जाधव यांनी व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड,दशरथ जाधव, सिकंदर शेख, राजू ब्रदर जाधव, श्याम जाधव, ताज ग्रुपचे महंमद बिल्डर शेख,युसुफ शेख, शंकर लोखंडे, बादशाह शेख, आलम शेख, पांडू दोडमणी, सोहेल जवळगी आदींची उपस्थिती होती.