विधात्याने घडवून आणलेला योगायोग ; मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा वाढदिवस…

विधात्याने घडवून आणलेला योगायोग म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा वाढदिवस…

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्तीमत्व अशी असतात जी आपल्या कर्तुत्वाने,नेतृत्वाने,आणि राजकीय कौशल्याने लोकांच्या मनात कायमस्वरूपी स्थान निर्माण करतात अशा दोन दिग्गज नेत्यांची नावे म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब दोघांचाही जन्म २२ जुलै रोजी झाला. जरी त्यांचे जन्मवर्ष आणि वेळ वेगवेगळी असली तरी राजकारणातील त्यांचा प्रवास नेतृत्व आणि प्रभाव यात अनेक साम्य स्थळे दिसून येतात या दोन नेत्यांच्या राजकीय कारकीर्दीचा आणि त्यांचा योगायोगाने जोडलेला राजकीय मैत्रीच्या वाढदिवसाच्या दिवस म्हणजेच आजचा दिवस.

देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित दादा पवार साहेब यांना राजकारणाचा वारसा आपापल्या कुटुंबातून मिळाला असून अजित पवार यांना शरद पवार यांच्यासारखा दिग्गज नेत्याचा मार्गदर्शनाखाली राजकारणात येण्याची संधी मिळाली. तर देवेंद्र फडणवीस यांना संघ आणि भाजपच्या विचारसरणीने घडविले दोघांनीही आपल्या पक्षात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्या कणखर आणि आक्रमक नेतृत्वाने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. तर देवेंद्र फडणवीस साहेब यांना भारतीय जनता पक्षात आपल्या सुसंस्कृत आणि विचारसरणीने घडविले आहे म्हणून राजकारणात वजनदार नेते म्हणून ओळखले जातात. दोघांच्याही प्रशासकीय कामगिरीने त्यांना लोकनेते म्हणून ओळख मिळवून दिले आहे देवेंद्र फडवणीस साहेब यांनी 2014 ते 2019 या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे त्यांच्या कार्यकाळात जलयुक्त शिवार,मराठा आरक्षण,आणि मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग सारखा महत्वकांक्षी योजना राबवल्या गेल्या. मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडवणीस साहेब पुन्हा 2024 साली पुन्हा मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले आहेत. तर दुसरीकडे अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून अनेक वर्षे महाराष्ट्राच्या अर्थखात्यासह महत्त्वाची खाती सांभाळली त्यांची आर्थिक शिस्त आणि प्रशासकीय पकड यामुळे त्यांना कामाचा माणूस अशी ओळख मिळाली आहे दोघांचेही प्रशासनावर मजबूत पकट असल्याने त्यांचे निर्णय आणि धोरणे यांचा राजाच्या विकास वर मोठा परिणाम झालेला दिसत आहे.

सौ.राजश्री अनिल चव्हाण,भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा मा.नगरसेविका सौ राजश्री चव्हाण सोलापूर महानगरपालिका.

महाराष्ट्राच्या राजकारणात फोडाफोडी, हेवेदावे आणि पक्षांतर हे चालूच राहतील पण याच राजकारणात अजित पवार आणि देवेंद्र फडवणीस यांनी आपली मैत्री जपली आहे दोघेही एकमेकांना शुभेच्छा देतात एकमेकांच्या कामाचे कौतुक करतात आणि राजकीय मतभेद बाजूला सारून वैयक्तिक स्तरावर सौहार्द राखतात हा गुण त्यांना इतर राजकारण्यापासून वेगळे ठरवतो. 2019 मध्ये त्यांनी एकत्र येऊन सरकार स्थापनेचा प्रयत्न केला होता जरी तो अल्पजीवी ठरला तरी त्याच्या राजकीय समन्वयाची झलक यातून दिसून आली. प्रसार माध्यमांमध्ये त्यांच्या राजकीय डावपेचावर आणि निर्णयावर सतत चर्चा होत असते.तरुणांमध्येही त्यांचे नेतृत्व आणि कामाची पद्धत याबद्दल कौतुकाची भावना दिसून येत आहे.

देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित दादा पवार साहेब यांच्यासारख्या नेत्याकडून महाराष्ट्राला उच्चप्रतीचे समाजाभिमुख आणि विकासात्मक राजकारणाची अपेक्षा आहे त्यांच्या अनुभवाचा आणि नेतृत्वाचा उपयोग सध्या होत असून राज्याला प्रगतीच्या दिशेने नेण्याची क्षमता यांच्यात आहे. त्यांचे एकमेकांशी असलेले सौहार्दपूर्ण संबंध आणि राजकीय परिपक्वता यामुळे भविष्यातही महाराष्ट्राच्या राजकारणात सकारात्मक बदल घडतील अशी आशा जनता बाळगून आहेत. त्यासाठी आजचा दिवस म्हणजेच 22 जुलै रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री सन्माननीय अजित दादा पवार साहेब यांचा वाढदिवस म्हणजेच योगायोगच म्हणावा लागेल अशा ह्या लोकांसाठी सदैव विकासासाठी आसुरलेले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..

शुभेच्छुक -भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा नगरसेविका सौ राजश्री चव्हाण सोलापूर महानगरपालिका. व भाजपचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण

वाढदिवस जनतेच्या मनातील, महाराष्ट्राला क्रमांक एक वर पोहोचवणारे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा,वाढदिवस जनतेच्या विकास कामासाठी सदैव अग्रेसर असणारे, प्रशासनावर जरब असलेले उपमुख्यमंत्री सन्माननीय अजित दादा पवार साहेब यांचा. आज 22 जुलै एक अत्यंत महत्त्वाचा दिवस असून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री सन्माननीय अजित दादा पवार साहेब यांचा जन्मदिवस हा योग जुळून आला असून दोघेही जनतेच्या विकासासाठी आसुरलेले आहेत.जनतेच्या कामासाठी, विकासासाठी 24 तास स्वतःला झोकून दिलेले आहे त्यामुळे जनता त्यांना विकास पुरुष म्हणून जनमानसात लोकप्रिय ठरत आहेत.प्रशासनावर मजबूत पकड म्हणून अशी ह्या दोघांचीही ख्याती  आहे त्यामुळेच वरिष्ठ अधिकारी मनात भीती बाळगून असतात. असे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब, व अजित दादा पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….

शुभेच्छुक:-भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा मा.नगरसेविका सौ राजश्री चव्हाण सोलापूर महानगरपालिका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *