जन्नतुल फिरदोस कब्रस्तान‎चा होणार विकास – किसन‎ जाधव

जन्नतुल फिरदोस कब्रस्तान‎चा होणार विकास – किसन‎ जाधव

५० लाखांचा‎ विकासनिधीतून संरक्षण भिंत तसेच रस्त्याचे होणार काम 

सोलापूर व्हिजन  न्युज,

सोलापूर, दि.१४ डिसेंबर 

अल्पसंख्यांक‎ बहुल‎ भागातील‎ मूलभूत नागरी सुविधांना‎ भक्कम बळ देत सोलापूर महानगरपालिका‎ प्रभाग‎ क्रमांक‎ २२‎ येथील‎ जन्नतुल‎ फिरदोस कब्रस्तानसाठी‎ रस्ता‎ काम‎ व‎ सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षण भिंत उभारणीसाठी‎ प्रत्येकी‎ २५‎ लाख रुपये, असा‎ एकूण‎ ५० लाख‎ रुपयांचा‎ निधी सन‎ २०२५–२६ अल्पसंख्यांक‎ बहुल नागरिक क्षेत्राकरिता क्षेत्रविकास या योजनेअंतर्गत मंजूर‎ करण्यात‎ आला आहे.

प्रभागाचे‎ माजी नगरसेवक किसन‎ जाधव तसेच‎ नगरसेवक‎ नागेश गायकवाड यांनी अल्पसंख्यांक बांधवांना‎ दफनविधीच्या वेळी‎ होणाऱ्या अडचणी,‎ पावसाळ्यातील गैरसोय‎ आणि कब्रस्तानच्या‎ सुरक्षिततेचा गंभीर‎ प्रश्न‎ सातत्याने‎ शासनदरबारी‎ प्रभावीपणे मांडत‎ ठोस‎ पाठपुरावा केला‎ होता.‎ यापूर्वी उपमुख्यमंत्री‎ अजित पवार यांच्या विशेष निधीतून जन्नतुल‎ फिरदोस कब्रस्तान‎ येथे‎ ५० लाखांचे‎ सांस्कृतिक भवन‎ मंजूर होऊन त्याचे‎ भूमिपूजन नजीब‎ मुल्ला यांच्या हस्ते‎ पार‎ पडले होते. त्याच भूमिपूजन सोहळ्यात किसन जाधव‎ यांनी‎ रस्ता आणि सुरक्षा भिंतीसाठी मागणी‎ मांडली‎ होती.‎ त्या‎ मागणीची‎ दखल‎ घेत नजीब मुल्ला यांनी‎ तत्काळ उपमुख्यमंत्री अजित पवार‎ यांच्याकडे शिफारस‎ केली‎ होती. त्याचा‎ परिणाम म्हणून आज हा निधी प्रत्यक्षात‎ मंजूर झाला‎ आहे. लवकरच या कामाचे प्रत्यक्षात सुरुवात होणार असल्याची माहिती माजी नगरसेवक किसन जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. या पत्रकार‎ परिषदेस‎ हाफिज‎ सनामूल्ला, तय्यब‎ अली, आसिफ‎ शेख, महंमद‎ आळगी, असलम‎ इनामदार,‎ महबूब कुडले, शहानवाज‎ शेख, सैपन‎ शेख, जाकीर शेख,‎ सुलेमान‎ शेख, फिरोज‎ पठाण आदींची‎ उपस्थिती होती.‎

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *