प्रभाग‎ क्र. २२‎ मध्ये‎ टाकारी‎ समाजासाठी‎ सांस्कृतिक‎ हक्काचे‎ स्वप्न साकार

प्रभाग‎ क्र. २२‎ मध्ये‎ टाकारी‎ समाजासाठी‎ सांस्कृतिक‎ हक्काचे‎ स्वप्न साकार

उपमुख्यमंत्री अजित‎ पवार‎ यांच्या‎ विशेष निधीतून‎ ५० लाखांचे‎ सांस्कृतिक‎ भवन नगरसेवक किसन‎ जाधव‎ व नागेश‎ गायकवाड यांच्या‎ भरीव‎ प्रयत्नांना यश

सोलापूर‎ व्हिजन न्युज,

‎सोलापूर, दि.१५ डिसेंबर 

प्रभाग‎ क्रमांक‎ २२ येथे‎ लोकशाहीर‎ अण्णाभाऊ साठे‎ नागरी‎ वस्ती सुधारणा‎ योजनेअंतर्गत‎ टकारी‎ समाजासाठी उभारण्यात‎ आलेल्या सांस्कृतिक‎ भवनाचा‎ भव्य‎ उद्घाटन‎ सोहळा‎ उत्साही व ऐतिहासिक वातावरणात‎ संपन्न‎ झाला.‎ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा‎ पवार,‎ राष्ट्रवादी काँग्रेसचे‎ प्रदेशाध्यक्ष तथा‎ खासदार‎ सुनील तटकरे यांच्या‎ मार्गदर्शनाखाली तसेच‎ राष्ट्रवादी काँग्रेस‎ पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष‎ व प्रभाग क्र. २२ चे‎ लोकप्रिय नगरसेवक किसन जाधव‎ आणि सहकारी‎ नगरसेवक नागेश‎ गायकवाड यांच्या अथक व विशेष‎ प्रयत्नातून‎ हा‎ महत्त्वाकांक्षी‎ विकासप्रकल्प‎ साकार‎ झाला‎ आहे.

विशेष म्हणजे‎ उपमुख्यमंत्री‎ अजित पवार‎ यांच्या विशेष‎ विकास‎ निधीतून‎ ५० लाख रुपयांचा‎ भरीव निधी‎ या सांस्कृतिक‎ भवनासाठी‎ मंजूर करण्यात‎ आला असून, त्यामुळे‎ टाकारी समाजाच्या‎ सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक‎ उपक्रमांना कायमस्वरूपी व्यासपीठ उपलब्ध झाले‎ आहे. याप्रसंगी‎ टाकारी‎ समाजाच्या‎ वतीने‎ नगरसेवक‎ किसन‎ जाधव व‎ नगरसेवक‎ नागेश गायकवाड‎ यांचा‎ शाल व‎ फेटा‎ बांधून‎ सन्मान‎ करण्यात आला.‎ समाजाच्या‎ विकासासाठी निधी उपलब्ध‎ करून‎ दिल्याबद्दल‎ समाजबांधवांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली‎ यावेळी‎ समाजाचे जेष्ठ‎ टकारी‎ समाजाचे‎ अध्यक्ष‎ गैबू (काका)जाधव,‎ डॉक्टर‎ सायबु‎ गायकवाड, युवक अध्यक्ष विनोद‎ जाधव‎ यांनी आपले मनोगत व्यक्त‎ करत‎ किसन जाधव‎ आणि‎ नागेश गायकवाड यांचे आभार‎ मानले तसेच टकारी समाजातील‎ राष्ट्रीय‎ खेळाडू‎ अंबादास गायकवाड‎ यांची‎ कबड्डी राष्ट्रीय प्रशिक्षक (कोच)‎ पदी‎ निवड‎ झाल्याबद्दल नगरसेवक‎ किसन जाधव यांच्या हस्ते शाल व‎ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा‎ विशेष‎ सन्मान करण्यात‎ आला व पुढील‎ वाटचालीस शुभेच्छा‎ देण्यात आल्या. टकारी‎ समाज हा परिश्रम,‎ एकजूट‎ आणि‎ स्वाभिमान जपणारा समाज म्हणून ओळखला‎ जातो.‎ समाजाची सांस्कृतिक‎ ओळख‎ जपली‎ जावी,‎ युवकांना दिशा‎ मिळावी‎ आणि पुढील पिढीला‎ संस्कारांचे‎ केंद्र उपलब्ध‎ व्हावे, या भावनेतूनच किसन‎ जाधव व‎ नागेश गायकवाड‎ यांनी‎ सातत्याने‎ पाठपुरावा‎ करून हा निधी मंजूर‎ करून‎ घेतला, अशी भावना‎ उपस्थित समाजबांधवांनी व्यक्त‎ केली.‎ या उद्घाटन‎ सोहळ्यास टाकारी समाजातील‎ ज्येष्ठ‎ व‎ मार्गदर्शक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित‎ होते.‎ यामध्ये‎ गैबु‎ (काका)जाधव डॉ.‎ साहेबराव‎ गायकवाड, बसु‎ मामा गायकवाड,‎ शिवाजी‎ जाधव,‎ सुनील‎ जाधव, विद्यासागर (पिंटु)जाधव, तुकाराम‎ मामा‎ जाधव,‎ भारत जाधव,‎ सायबु गायकवाड सुहास सर‎ राजु‎ जाधव दिपक‎ (सरपंच)जाधव यांच्यासह‎ समाजाचे आधारस्तंभ सहभागी‎ झाले‎ होते.‎ युवकांचे‎ नेतृत्व‎ करत‎ टाकारी समाज‎ युवक‎ अध्यक्ष‎ विनोद‎ जाधव,‎ तसेच‎ सचिन अक्षय‎ जाधव, सूर्यकांत‎ मामा गायकवाड, राजाराम जाधव, सचिन जाधव, अंबादास गायकवाड, सुहास‎ सर‎ जाधव‎ निखिल हैसनुर आदी‎ युवक कार्यकर्ते‎ मोठ्या संख्येने‎ सहभागी‎ झाले‎ होते.‎ यावेळी महिला भगिनींची उपस्थितीही‎ उल्लेखनीय‎ ठरली.

पारुबाई जाधव‎ प्रयगाबाई गायकवाड, इंदुताई गायकवाड,‎ पुनमताई गायकवाड, राजश्रीताई जाधव, नेहा(डॅाली)जाधव‎ महादेवीताई‎ जाधव,‎ कमळाताई‎ जाधव, रेखाताई‎ गायकवाड,‎ शांताताई‎ गायकवाड, भिमताई‎ गायकवाड यांच्यासह‎ माता-भगिनी‎ बहुसंख्येने उपस्थित‎ होत्या. या प्रसंगी‎ उपस्थित समाजबांधवांनी‎ किसन‎ जाधव व नागेश गायकवाड यांच्या समाजाभिमुख, विकासनिष्ठ‎ नेतृत्वाचे‎ विशेष‎ कौतुक‎ केले. समाजाच्या गरजा समजून‎ घेणारे, निधी‎ आणणारे आणि प्रत्यक्ष काम पूर्ण‎ करणारे नेतृत्व म्हणून‎ त्यांचा गौरव करण्यात आला. टकारी समाजासाठी‎ हे सांस्कृतिक‎ भवन‎ म्हणजे केवळ इमारत नसून,‎ एकतेचे,‎ स्वाभिमानाचे आणि पुढील‎ पिढीच्या‎ उज्ज्वल‎ भवितव्याचे‎ केंद्र ठरणार आहे, अशी‎ भावना‎ यावेळी‎ व्यक्त‎ करण्यात‎ आली.‎ एकूणच, हा‎ उद्घाटन सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक‎ बांधिलकीचा,‎ विकासाभिमुख राजकारणाचा‎ आणि किसन‎ जाधव,‎ नागेश गायकवाड‎ यांच्या समाजनिष्ठ नेतृत्वाचा‎ ठसा उमटवणारा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *