प्रभाग २२ मध्ये ५ रस्त्यांच्या काँक्रीटीकरण व डांबरीकरण कामांचे उद्घाटन
दर्जेदार व टिकाऊ सुविधा मिळाल्याने नागरिकांचे जीवनमान उंचावणार” – किसन जाधव
सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.४ नोव्हेंबर
सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २२ मधील नागरिकांना दर्जेदार आणि टिकाऊ मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने नगरसेवक किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून पाच रस्त्यांच्या काँक्रीटीकरण व डांबरीकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी नगरसेवक किसन जाधव म्हणाले प्रभागातील नागरिकांना अतिउच्च प्रतीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आणखी निधी खेचून आणला जाईल. आम्ही या कामांद्वारे नागरिकांचा विश्वास कायम ठेवू असे त्यांनी सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे ,महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे व महायुती सरकार यांच्या सहकार्याने हा विकास आराखडा साकारण्यात आला आहे.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना (सन २०२४-२५) अंतर्गत आम्रपाली परिसर कडे जाणारा रस्त्यासाठी १२ लाख१५ हजार९८६ रु, प्रभाकर गायकवाड घर ते तळभंडारे चौक रस्त्यासाठी १३लाख ३२हजार ३२६ रुपये, तळ भंडारे चौक ते चांद तारा चौक पर्यंत रस्ता करणे १३ लाख ३२ हजार ३२६ रुपयें, मोठी इराण्णा वस्ती जवळ जाणारा रस्ता काँक्रिटीकरण करणे रक्कम १२लाख३० हजार ०९६ रुपये तसेच महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान या योजनेअंतर्गत सुशील मराठी शाळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत रस्ता करणे कामी ३४ लाख ९६ हजार ८२५ रुपये असे एकूण ८६ लाख ०७ हजार;५५९रुपयांचा असा सर्वाधिक निधी मंजूर करून घेण्यात आला. या सर्व रस्त्यांच्या काँक्रीटीकरण व डांबरीकरण कामांचा शुभारंभ पूजन विधीपूर्वक करण्यात आला.
याप्रसंगी ॲड होसमनी , शिवलिंग जामदार, ॲड. कामतकर मॅडम, रजिया अफा शेख, सुनीता बोरा,रफिक भाई शेख, मोतीलाल करबसू जाधव,तांबोळी चाचा,अब्दुल सय्यद, गौतम सरवदे,जाकीर कवठेकर, शहाजान कवठेकर संजय भडंगे, सोनू तळभंडारे, जाकीर फुलारी, शरणाप्पा घंटे,रमेश चलवादि,बाळू कोरे महाराज ,विजय तळभंडारे,अभय साळुंखे, नंदाताई लामतुरे, रुक्मिणी लामतुरे, अपर्णा लांडगे, रोमा गायकवाड, मनीषा लांडगे, नागदेवी जाधव, महानंदा पुजारी,पार्वती चौधरी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक २२ मध्ये मागील काही वर्षांपासून मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत होता. या नव्या काँक्रीटीकरण व डांबरीकरण कामांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, प्रभागाच्या विकासकामांना वेग मिळणार आहे. नागरिकांनी नगरसेवक किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांचे पुष्पहार, मखमली टोपी घालून मनःपूर्वक आभार मानले.