सोलापुरातून लवकरच विमानसेवा सुरू करणार उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही – किसन जाधव..!

सोलापुरातून लवकरच विमानसेवा सुरू करणार उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही – किसन जाधव..!

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे इच्छा भगवंताची परिवाराकडून पिंक पुष्पगुच्छ देऊन स्वागत..

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि. २२ सप्टेंबर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे जनसन्मान यात्रेनिमित्त आले होते. यादरम्यान इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं अनगर येथील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार राजन पाटील यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी पिंक पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर, मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार राजन पाटील, बाळराजे पाटील, अजिंक्यराणा पाटील, शेळगावचे उद्योजक ज्येष्ठ नेते हनुमंतराव माने गुरुजी, पांडुरंग साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, अनिल कादे, माझी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, प्रांतिक सदस्य महेश निकंबे, माणिक कांबळे, हुलगप्पा शासम, अमोल जगताप, महादेव राठोड, सत्यम जाधव,पवन बेरे, संगीता जोगदनकर , चित्रा कदम शशिकला कस्पटे, रुक्मिणी जाधव, शोभा गायकवाड, प्रमिला बिराजदार, संगीता गायकवाड यांच्यासह इच्छा भगवंताची परिवाराचे सदस्य आदींची उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना अजित पवार म्हणाले की, सोलापूरकरांचे स्वप्न आता साकार होणार असून सोलापूर विमानतळावरून लवकरच विमान सेवा सुरू होईल मी शब्दाचा पक्का आहे. मिळालेल्या संधीचा आणि पदाचा वापर करून आपल्या भागातील लोकांचा विकास करण्यासाठी मी नेहमी कटिबद्ध असतो. त्यामुळेच सोलापूरकरांच्या मागणीनुसार लवकरात लवकर येणाऱ्या काही दिवसात सोलापूर विमानतळावरून विमानाचा उड्डाण होईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी किसन जाधव यांना दिली.राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्ष वाढीसह पक्षाच्या बळकटीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, अशा सूचना देखील यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

अखेर विमानसेवेचा प्रश्न मार्गी लागला असून सोलापूर विमानतळावरून विमान सेवा सुरू होईल अशी ग्वाही देखील यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्हाला दिली असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांनी सांगितले. या स्वागत समारंभ प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि इच्छा भगवंताची मित्र परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *