Deputy CM Devendra fadnavis तेवीस लाखाची हार्ट ट्रान्सप्लांट यशस्वी……
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वैद्यकीय कक्षाकडुन विजय धुमाळ यांना मिळाले जीवदान
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि ४ ऑगस्ट – महाराष्ट्र शासनाच्या जनकल्याणाच्या अनेक योजना आहेत. त्याचा लाभ सामान्य जनतेला मिळाला पाहिजे, यासाठी शासन प्रयत्नशील असून अशाच प्रयत्नातून नगर जिल्ह्यातील रूग्णाला नवजीवन मिळाले आहे.विशेष वैद्यकीय मदत कक्ष सुरू केल्याने विजय निवृत्ती धुमाळ या रूग्णाला हार्ट मधून नवजीवन मिळाले आहे. या रूग्णाच्या हार्ट ट्रान्सप्लांट नंतर त्याच्या कुटुंबियानी शासनाचे आभार व्यक्त केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्य सरकारने एक महत्वाचा वैद्यकीय उपक्रम सुरू केला. याउपक्रमात गरीब रुग्णांना राज्यातील खासगी तसेच धर्मदाय रुग्णालयात १० टक्के आरक्षित खाटा उपलब्ध होणार आहेत. यासाठी तातडीने मंत्रालयातील मुख्य इमारतीच्या ५ व्या मजल्यावर विशेष वैद्यकीय मदत कक्ष सुरू केल्याने विजय निवृत्ती धुमाळ या रूग्णाला नवजीवन मिळाले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील विजय धुमाळ यांना हृदयाचा त्रास असल्याचे स्थानिक रुग्णालयात निदान झाले होते, त्याचं ह्रदय निकामी झाल्याने पुण्यातील नामवंत रूबी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया झाली, रुग्ण प्रकृतीत सुधारणा होऊ लागली, उरला होता तो प्रश्न, लाखो रुपयांच्या बिलाचा. गेल्या २०-२२ दिवसापासून संबधित हाॅस्पिटलकडून बिल भरण्यासाठी तगादा लावला असताना, सामान्य कुटुंबाकडं इतकी मोठी रक्कम येणार कुठून ? हाही सवाल होताचं. त्यांनी मदतीसाठी खुलं आवाहन देखील केलं होते, मात्र मदत मिळू शकली नाही. धुमाळ कुटुंबाची समस्या रूग्णसेवक आनंद गोसकी यांच्यापर्यंत आली अन् रुग्णसेवक गोसकी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी संकल्पनेतून निर्धन व दुर्बल घटकातील गरजू रूग्णांकरीता राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख आरोग्यदूत रामेश्वर नाईक यांना गोसकी यांनी रूग्णाची अत्यंत बिखट परीस्थिती असल्याचे सांगितले.
आरोग्यदूत म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाणारे रामेश्वर नाईक यांनी संवेदनशीलतेने विजय धुमाळ या रुग्णाच्या तब्बल 23 लाख रूपये बिलाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यस्तरीय वैद्यकीय कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक आणि रूग्णसेवक आनंद गोसकी यांनी केलेली मदत यांच्या त्रिवेणी संगमावर धुमाळ कुटुंबियांनी आनंदाश्रूनं आभार मानले. गोरगरीबांसाठी कार्यतत्परआणि गतिशील सरकारचं हे सहकार्य आयुष्यभर विसरणार नाही, असंही धुमाळ कुटुंबियांनी म्हटलं आहे.