महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ…

सोलापूर व्हिजन
सोलापूर दि २४ जुलै – राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार व प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त व जन विश्वास सप्ताह निमित्त जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या मान्यतेने शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी व अजित पवार यांचे विचार ,कार्य ,प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीने अजित दादांच्या विकास पर्व कार्य शैलीवर आधारित लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेच्या प्रसिद्धी पत्रकाचे अनावरण जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर, युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का , समन्वयक दत्तात्रय बडगंची,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष सुजित अवघडे , विनायक रायकर यांच्या शुभहस्ते जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांच्या पार्क चौक येथील जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले.

शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीने आवाहन करण्यात येते की या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा. स्पर्धेमधील विजेत्या स्पर्धकास लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित पर्वा चषक देण्यात येणार आहे अशी माहिती सोशल मीडिया विभागाचे शहर – जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे यांनी माध्यमांना दिली.
जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी त्यांच्या भाषणात सोशल मीडिया विभागाच्या वतीने शहर- जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे यांनी अजित दादांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या लेखन स्पर्धेचे विशेष कौतुक केले. अजित दादांनी अनेक योजनांच्या माध्यमातून राज्याचा विकास केला आहे. विकासरत्न , राज्याचे दमदार नेतृत्व, कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अशी प्रामुख्याने ओळख अजित दादांची आहे. त्यामुळेच महायुती सरकार वेगवान पद्धतीने अजित दादांचे नेतृत्वात सर्वांगीण विकास साधत आहे.

महिला युवक ,युवती, ज्येष्ठ नागरिक , शालेय विद्यार्थी , दिव्यांग या सर्वांसाठी दादांनी विविध योजना राबवले आहेत. त्याचा लाभ अनेकांना झाला आहे. यापुढे होईल अशी प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली.