पंचनामे तातडीने पूर्ण करा, मदत पुनर्वसनासाठी कुठलीही दिरंगाई करू नका अजित पवारांनी दिल्या जिल्हा प्रशासनाला सूचना

प्रभाग.२२ व सोलापूर शहरातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून मदत मिळावी किसन जाधवांनी केली उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी

पंचनामे तातडीने पूर्ण करा, मदत पुनर्वसनासाठी कुठलीही दिरंगाई करू नका अजित पवारांनी दिल्या जिल्हा प्रशासनाला सूचना…

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून सोलापूर शहर जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू आहे उजनी आणि भीमा नदीत आणि सिना धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने शहर जिल्ह्यात महापूरस्थिती निर्माण झाली आहे. उजनी आणि सिना धरणांमधून सोडलेल्या पाण्यामुळे अनेक गावे पुराच्या पाण्यात सापडले आहेत शेकडो एकर शेतीचे नुकसान झालं अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे अनेक घरांची पडझड झाल्याने अनेक कुटुंब रस्त्यावर आले आहेत ही गंभीर परिस्थिती सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये निर्माण झाले आहे.

या नैसर्गिक आपत्तीत लोकांचा मृत्यू देखील झाला दरम्यान गेल्या काही दिवसापासून अतिवृष्टीमुळे प्रभाग क्रमांक २२ मधील यतीम खाना, रामवाडी, लिमयेवाडी, धोंडीबा वस्ती, गैबीपीर नगर, विजापूर नाका, भीम नगर, कारगिल वस्ती, या परिसरात मोठ्या स्वरूपात मैलामिश्रित पाणी नागरिकांच्या घरात शिरले असून या परिसरात पावसाळी गटारी नसल्यामुळे पाण्याचा निचरा देखील व्यवस्थित होत नाही या भागात मोठ्या स्वरूपात मैलामिश्रित पाणी साचल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रभाग क्रमांक २२ मधील यतीम खाना येथे पावसाळी गटारीचे पाणी पाईपलाईन नवीन टाकणे आणि  धोंडीबा वस्ती येथील नाल्याचे पडदी बांधणे या कामासाठी आपणाकडून निधी मिळावी तसेच तात्काळ या परिसरातील पंचनामे करून प्रशासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळावी आणि या पुढील काळात अशी परिस्थिती उद्भवणार नाही याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाला सूचना कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी बुधवारी पुना नाका येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली. याप्रसंगी माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, माजी नगरसेवक गणेश पुजारी, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष निलेश कांबळे, शहर सरचिटणीस अभिजीत कदम, शहर संघटक माणिक कांबळे, वसंत कांबळे, आनंद गाडेकर आदींची उपस्थिती होती. यावेळी प्रभाग क्रमांक २२ मधील झालेल्या नुकसानीच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित आपत्कालीन व्यवस्थापन अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी संपर्क करून तत्काळ या परिसरातील समस्याचे निराकरण करण्याच्या सूचना केल्या.तसेच काही दिवसापूर्वी रिक्षा चालक सतीश शिंदे बाळे पुलावरून वाहून गेले होते त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी देखील यावेळी किसन जाधव आणि आनंद चंदनशिवे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. याप्रसंगी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांचे पाहणी केले अजित पवार हे थेट शेतात उतरले आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी प्रशासनाला झालेल्या नुकसानीची तत्काळ पंचनामे करून मदत द्यावी मदत मिळण्यासाठी कुठलीही दिरंगाई प्रशासनाकडून होऊ नये अशा कडक शब्दात त्यांनी सूचना दिल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *