उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्यासाठी प्रार्थना…………
श्रीसिद्धरामेश्वरांच्या महाआरतीसह शहेनशाह शाहजहुर दर्गा येथे चादर अर्पण……
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि २० जुलै – राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष , खा.सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जनविश्वास सप्ताह अंतर्गत महिला आघाडीच्या वतीने उपमुख्यमंञी अजित पवार आणि खा.सुनील तटकरे यांच्या दीर्घायुष्य साठी गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यांची महाआरती रुद्राभिषेक करून संकल्प सोडला.
आजित पवार आणि सुनील तटकरे यांना निरोगी असे उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे याकरीता शहर महिला विभागाच्या अध्यक्ष संगीता जोगदनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम यांच्या वतीने ही महापुजा आयोजित करण्यात आली होती.
त्याचप्रमाणे सोलापूरातील शहनवाज शाहजहुर दर्गा येथे अल्पसंख्यांक विभागचे प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुऱ्हाण यांच्या हस्ते चादर अर्पण करून प्रार्थना केली. याचे आयोजन अल्पसंख्यांक अध्यक्ष आमिर शेख यांनी केले होते.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार , कार्याध्यक्ष जुबेर बागवान, अल्पसंख्यांक प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुरान, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले , ज्येष्ठ नेते आनंद मुस्तारे , राजेश देशमुख , अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अमीर शेख, कार्याध्यक्ष संजीव मोरे, मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेराज आबादीराजे त्याचप्रमाणे
शहर उत्तर विधानसभा कार्याध्यक्ष मनोज शेरला, ओबीसी विभाग शहराध्यक्ष अनिल छत्रबंध, तनवीर गुलजार , शामराव गांगर्डे , बसवराज कोळी , दशरथ शेंडगे, समदानी मत्तेखाने ,रेहान शेख, आयान शेख, महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम शहर समन्वयक ,शशिकला कस्पटे शोभा गायकवाड, प्रिया पवार ,कांचन पवार ,रुक्मिणी जाधव , संगीता गायकवाड , सरोजिनी जाधव आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्त उपस्थित होते.