Deputy CM Ajit Pawar birthday celebration…इच्छा भगवंताची परिवार आयोजित अजित्सोव सप्हाहास उत्स्फूर्त प्रतिसाद, विविध सामाजिक, योजनांचे उपक्रम…
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना शिबिरात दोन हजारांहून अधिक बहिणींची मोफत नोंदणी*
सोलापूर व्हिजन
महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी ही योजना महत्त्वाची-किसन जाधव…
सोलापूर दि 3 ऑगस्ट – राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष, तथा सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव, नगरसेवक नागेश गायकवाड, प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड आणि इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा, रामवाडी यूपीसी सेंटर मध्ये 22 जुलै रोजी जन्मलेल्या नवजात शिशूंच्या नावे पाच हजार रुपये राष्ट्रीयकृत बँकेत फिक्स डिपॉझिट करण्यात आले. तसेच क्षयरोग बाधित रुग्णांना सहा महिन्यांचे अन्नधान्याचे किट देखील वाटप करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी राजस्थान राज्यातील अजमेर येथील खाजा गरीब नवाज दर्ग्यात चादर चढवून दर्गा परिसरात गोरगरिबांना अन्नदान वाटप करून त्यांच्या इच्छापूर्तीसाठी बाबांकडे साकडं देखील घातलं.तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी 1 जुलै 2024 पासून सुरू झाली असून प्रभाग क्रमांक 22 येथे किसन जाधव यांच्या मार्गदर्शनाने महिलांसाठी दहा ठिकाणी मोफत नोंदणी उपक्रमात अल्पावधीतच 2000 हून अधिक महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना नोंदणी पूर्ण केली.
दरम्यान योजनेचा प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव म्हणाले की राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली महिलांच्या आर्थिक सशक्तिकरणासाठी ही योजना महत्त्वाची पायरी ठरणार असून योजनेच्या अंतर्गत महिलांना दर महिन्याला मिळणाऱ्या 1500 रुपयांच्या निधीमुळे महिलांना कौशल्य विकासासाठी मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतील लाडकी बहीण योजनेची पहिला दोन महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या अगोदर आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत या योजनेचा लाभ घेण्याकरिता मोफत नोंदणी करून महिलांनी अधिक अधिक लाभ घ्यावा असे आव्हान देखील यावेळी त्यांनी केलं. तसेच अधिका अधिक महिलांना या योजनेचा लाभ व्हावा या उद्देशाने ही मोफत नोंदणी आता 31 ऑगस्ट 2024 पर्यंत राबविणार असल्याचेही यावेळी जाधव म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अजितोत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डॉक्टर्स, नर्स, ब्रदर्स, कर्मचारी,आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका,आशा वर्कर्स यांच्यासह माणिक कांबळे,वसंत कांबळे, माऊली जरग, ऋषी येवले, फिरोज पठाण, कुमार जाधव, राजू जाधव, ढेरे रिक्षावाले, शिवराम गायकवाड,लल्ला कांबळे,अमोल जगताप,किरण शिंदे, अभिषेक अनवेकर, हुलगप्पा शासम, सोनू पटेल,अभिषेक पवार आदींनी परिश्रम घेतले तर या शिबिराचे शुभारंभ राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार, प्रदेश अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष,वसिम बुऱ्हाण, शहर अल्पसंख्यांकचे अमीर शेख, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, सरोजिनी जाधव, सायरा शेख,शशिकला कसपटे, रुक्मिणी जाधव, संगीता गायकवाड, शोभा गायकवाड,बिराजदार मावशी, प्रमिला स्वामी,लक्ष्मी आठवले आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.