बाल गोपाळांच्या बौद्धिक विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा अनोखा उपक्रम….
उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खा सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्यानाच्या बाहेर लावले संस्कृत मराठी इंग्रजी मुळाक्षर तसेच रंग आणि पक्षूपक्ष्यांची चित्रांचे फलक ..
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि २४ जुलै – राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार व प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त व जनविश्वास सप्ताह निमित्त स्टेट बँक कॉलनी मुलींच्या वसतिगृह शाळेसमोरील बाग येथे सोलापूर शहर उत्तर मतदार संघाच्या वतीने बाल गोपाळसाठी संस्कृत मराठी इंग्रजी मुळाक्षरे रंग पक्षूपक्षांचे चित्र फलकचे उद्घाटन व महायुती सरकारच्या वतीने महिलांसाठी आयोजित मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे मोफत अर्ज भरून घेण्याचा तसेच झाडे वाचवा झाडे जगवा याची जनजागृती करत या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर उत्तर विधानसभेच्या वतीने या अनोख्या उपक्रमाने बागेत खेळणाऱ्या बाल गोपाळांच्या बौद्धिक विकासासाठी, व बालगोपाळांना प्राणीमात्रांची ओळख होण्यासाठी विविध रंगांची विशेष ओळख होण्याच्या उद्देशाने बागेच्या बाहेर चित्र फलकाचे अनावरण करण्याचा कार्यक्रम आयोजित केले होते.
चित्र फलकाचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक मारुती जाधव यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून तसेच जेष्ठ नेते श्रीनिवास कोंडी यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. तसेच OBC विभाग सेल प्रदेश उपाध्यक्ष ऍड.सलीम नदाफ माजी नगरसेवक नारायण माशाळकर , ओ.बी.सी. विभाग अध्यक्ष अनिल छत्रबंद, दशरथ शेंडगे – देशमुख यांच्या हस्ते यावेळी वृक्ष वल्ली आम्हा सोयरे या पर्यावरणाचा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आले.
त्याचबरोबर तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मोफत अर्ज भरण्याचे शिबिराचे उद्घाटन महिला आघाडी शहराध्यक्ष संगीता जोगधनकर युवती अध्यक्ष किरण माशाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी प्रातिनिधिक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे प्रातिनिधिक स्वरूपात पाच महिलांचे अर्ज स्वीकारण्यात आले.यावेळी एकच वादा अजित दादा,विकासाचा वादा अजित दादा ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो,अश्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.
यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भाषणात राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जनसप्ताह निमित्त आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर उत्तर विधान सभा मतदार संघाचे प्रकाश झाडबुके मनोज शेरला सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव यांच्या वतीने आयोजित केलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
या प्रसंगी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले,सोशल मीडिया शहर- जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे ,वाहतूक विभाग अध्यक्ष इरफान शेख, ओ.बी. सी. विभाग कार्याध्यक्ष बाबू पटेल ,आयुब शेख , अर्जुन माळी,ॲड.अमोल कोटीवाले, रमेश अण्णा जाधव ,विजयकुमार झाडबुके,राजू पवार सिद्धराम यलशेट्टी , बाबुराव ईरवडकर, कविता खानापुळे, उमादेवी झाडबुके ,आशादेवी जाधव , बिराजदार ,प्रसाद खोबरे , हरणे ,जयश्री झाडबुके, शब्बीरजी नाईकवाडी, मोबीन भेलमे, प्रवीण खानागुळ, प्रशांत खानागुळ,सुनील गंभीरे,रवी बिराजदार,रवी पटणे मामा शीलरत्न कोर, महेश होटकर, यांच्यासह परिसरातील नागरिक , ज्येष्ठ नागरिक,महिला ,युवती , बालगोपाळ आदी उपस्थित होते.