अल्पसंख्यांकच्या विकासासाठी अजित पवारांच्या पाठीशी उभे रहा ;
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे आवाहन….
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि २० जुलै – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जनविश्वास सप्ताह अंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच ज्येष्ठ नागरिकांना आधार काटीचे वाटप अल्पसंख्यांक प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुऱ्हाण यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले,आनंद मुस्तारे, भास्कर आडकी, सेवा दल अध्यक्ष प्रकाश जाधव, मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेराज आबादीराजे , ओबीसी सेल अध्यक्ष अनिल छत्रबंद वैद्यकीय अध्यक्ष बसवराज कोळी, वाहतूक आघाडी अध्यक्ष इरफान शेख , सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे ,महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम, महिला समन्वयक शशिकला कस्पटे अध्यक्ष किरण माशाळकर कांचन पवार उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक प्रदेश कार्याध्यक्ष वसिम बुऱ्हाण यांनी त्यांच्या भाषणात राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमी अल्पसंख्यांक विभागाच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे आहेत. अजित पवारांनी आजपर्यंत अल्पसंख्याक विभागाला कधीही अंतर दिला नाही, देणार नाही असे प्रतिपादन केले. अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष अमीर शेख यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहर दक्षिण विधानसभा अध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग अशपाक कुरेशी , दक्षिण विधानसभा कार्याध्यक्ष मूहिज मुल्ला, समन्वयक जाहीर शेख, समदानी मत्तेखणे, शाहिद शेख, आबरार हसापुरे, सोहेल मुंशी, हमीद अत्तार, मुजम्मिल शेख, अरबाज पटेल, आसिफ शेख , अखिल शेख, आसिफ दफेदार, फैसल शेख, आसिफ मुजावर इफ्तेकर जागीरदार तन्वीर गुलजार आणि अथक परिश्रम घेतले.