डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात…
शहा यांची काढली प्रतीकात्मक तिरडी काढल्याने केली कारवाई
अमित शहा यांच्या “त्या” वक्तव्याचे शहरात पडसाद !
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१८ डिसेंबर
देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या त्या वक्तव्याचे सोलापूर शहरात जोरदार पडसाद उमटत आहेत. सोलापूर शहरात एसटी स्टँड समोर डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात प्रतिकात्मक तिरडी आंदोलन केले. गृहमंत्री अमित शाह यांची प्रतिकात्मक तिरडी काढून केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
दरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल काँग्रेस कमिटीने काँग्रेस भवन समोर जोडेमार आंदोलन केले होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्याचा प्रयत्न केला होता. सदरची ही घटना ताजी असतानाच, पुन्हा एकदा शहरात आंदोलन करण्यात आल्याने वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे. यावेळी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्र सरकारचा जोरदार निषेध नोंदवला. यावेळी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी रोहित खिलारे, मिथुन लोखंडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले.