राखी पौर्णिमेनिमित्त मूकबधिर विद्यार्थी पर्यावरणपूरक राख्या बनवण्यात व्यस्त…सौदर्यपूर्ण राख्यांचे भरवले जाणारा प्रदर्शन..

राखी पौर्णिमेनिमित्त मूकबधिर विद्यार्थी पर्यावरणपूरक राख्या बनवण्यात व्यस्त…सौदर्यपूर्ण राख्यांचे भरवले जाणारा प्रदर्शन..

सोलापूर व्हिजन 

सोलापूर दि ३० जुलै – भावा बहिणीचे अतूट नाते म्हणून राखी पौर्णिमेकडे पाहिले जाते. याच राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर मूकबधिर विद्यार्थी आपल्या हस्तकौशल्याच्या जोरावर आकर्षक आणि सौंदर्यपूर्ण राख्या बनवण्यात व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे.

                    सोलापूर शहरातील ममता मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी राखी पौर्णिमे निमित्त सौंदर्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण अशा पर्यावरणपूरक राखी बनवण्याचे कार्य सुरू केले आहे. सायन लैंग्वेजच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने राख्या बनवायच्या हे शिकवले जात आहे. या विद्यालयामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना हस्तकौशल्याच्या माध्यमातून राखी पौर्णिमेच्या अनुषंगाने राखी बनवणे , दिवाळीच्या सणामध्ये आकर्षक आकाश कंदील आणि पणती तयार करणे, असे विविध उपक्रम घेतले जातात. त्याच अनुषंगाने राखी पौर्णिमा सण दृष्टिक्षेपात आला आहे. भावा बहिणीचे अतूट नाते या सणामधून दिसून येते. याच राखी पौर्णिमेनिमित्त पर्यावरण पूरक अशी राखी बनवली जात आहे. राखी पौर्णिमा सणाच्या एक महिन्या अगोदर पासून याचे कामकाज सुरू होते. 

    दरम्यान सदरची राखी ही पर्यावरण पूरक आहे. पेपर क्विलिंगसह मोती ,  खडे , सुती दोरा , चमकीचा दोरा , फेविकॉल या अशा विविध साहित्याच्या माध्यमातून आकर्षक अशी राखी तयार केली जात आहे. ममता मूकबधिर विद्यालयातील विविध वर्गातील विद्यार्थी यामध्ये हिरहिरीने सहभाग नोंदवतात. यासाठी शाळेतील मुख्याध्यापिका संगीता गायकवाड , हस्तकला शिक्षक नीता देशपांडे , सहशिक्षिका मेघा जोशी आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभत आहे.

राखी प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन

राखी पौर्णिमा दिवशी शाळेच्या प्रांगणामध्ये सदरच्या आकर्षक राख्यांचे प्रदर्शन भरवले जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी तयार केलेले राख्या या ठिकाणी प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत. परिसरातील नागरिकांनी तसेच सोलापूरवासियांनी या राख्यांचे प्रदर्शन पाहावे आणि राखी खरेदी करावी असे आवाहन शाळा आणि विद्यार्थ्यांच्यावतीने करण्यात आले आहे.

हस्तकौशल्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिला जातो व्यावसायिक आणि पर्यावरण दृष्टिकोन….

ममता मूकबधिर विद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी हे मूकबधिर आहेत. त्यांच्या पुढील जीवनात हस्तकौशल्याच्या माध्यमातून व्यवसायीक दृष्टिकोन निर्माण केला जात आहे. स्वतःच्या पायावर उभे राहून एखादा व्यवसाय सुरू करून हे मूकबधिर विद्यार्थी विद्यार्थिनी कोणावरही अवलंबून न राहता. आपला उदरनिर्वाह करू शकतात. या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोन यांची सांगड घालून शिक्षण दिले जात आहे. विद्यार्थी देखील मोठ्या उत्साहात यामध्ये सहभाग नोंदवून आपले कलागुण अविष्कार सादर करत असतात.

नीता देशपांडे , हस्तकला शिक्षिका ममता बधिर विद्यालय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *