पूज्य भदंत शिलरत्नजी लेझीम ताफा सराव सुरू ; धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त विशेष आकर्षण

 न्यू बुधवार पेठ येथील पूज्य भदंत शिलरत्नजी लेझीम ताफा यांच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त न्यु बुधवार पेठ येथील भागात लेझीम सरावास सुरूवात करण्यात आली…

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर प्रतिनिधी 

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी बौद्ध धम्माचा स्वीकार करून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. म्हणजे विजयादशमी या दिवशी नागपूरच्या दीक्षाभूमी येथील लाखो अनुयायांसोबत बौद्ध धम्माचा स्वीकार करून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.

विजयादशमी दिनांक ०२ ऑक्टोबर २०२५ यादिवशी असल्यामुळे मिरवणुकीच्या माध्यमातून धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरातील हजारो संख्येच्या स्वरूपातून लेझीम खेळाडू या मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवतात दरम्यान न्यू बुधवार पेठ येथील पूज्य भदंत शिलरत्नजी लेझीम ताफ्याचे व तसेच बॉबी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आयोजक अजित गायकवाड यांच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त न्यू बुधवार पेठ येथील भागात लेझीम सरावा सुरुवात करण्यात आली प्रारंभी आमदार विजयकुमार देशमुख माजी नगरसेवक अमर पुदाले अरुण भालेराव माजी नगरसेविका वंदना गायकवाड बॉबी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजित गायकवाड मधुकर दोड्यानूर आदींच्या प्रमुख उपस्थितीत सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन लेझीम सरावास प्रारंभ करण्यात आला.

यावेळी अश्विन गायकवाड, महेश गजधाने, कपिल घोडके बॉबी ग्रुपचे अध्यक्ष शिवाजी थोरात डी मधू ,सुनील शिवशरण अश्विन गायकवाड महेश गजधाने, सचिन गायकवाड राहुल हुब्बारे अभिजीत कांबळे सुहास सिताफळे आतिश होसमणी दत्तामामा शिवशरण सोनू दोडयानुर पवन कांबळे धम्मपाल सर्वगोड सुमेध धेंडे सुयश गायकवाड दत्ता मामा शिवशरण ,सुधाकर राजगुरु, केवळ उबाळे राहुल हुब्बारे, अभिषेक डोळसे ,धिरज सातपुते साहेब आकाश कांबळे दादा सरवदे विनोद सरवदे आणि बॉबी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *