श्रीनिवास संगा यांची मध्य मधून माघार ; उप मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मध्यस्थीने साधले सुवर्णमध्य सोलापूर शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचे घेतले आश्वासन  

श्रीनिवास संगा यांची मध्य मधून माघार ; उप मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मध्यस्थीने साधले सुवर्णमध्य 

तेलुगू भाषिकांच्या व सोलापूरच्या विकासासाठी ठामपणे उभे राहण्याचे फडणवीसांकडून संगा यांना आश्‍वासन !

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.४ नोव्हेंबर- सोलापूर शहर मध्य मतदारसंघात भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकवलेल्या भाजपचे कार्यकर्ते श्रीनिवास संगा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या शब्दाखातर सोमवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत निवडणुकीतून माघार घेतली.

सोलापूरच्या एकूण विकासासाठी विडी, यंत्रमाग उद्योगासह या कामगारांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी तसेच नवीन उद्योगधंदे आणण्यासंदर्भात आपण तुमच्या पाठीशी राहू, असे आश्‍वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे संगा यांनी सोमवारी शहर मध्ये निवडणूक कार्यालयासमोर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

तत्पूर्वी संगा हे शहर मध्यमधून भाजपतर्फे विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. याच उद्देशाने त्यांनी लोकसभेच्या निवडणुकापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपने या मतदारसंघात देवेंद्र कोठे यांना संधी दिल्यामुळे संगा हे प्रचंड अस्वस्थ झाले होते. त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या पार्श्‍वभूमीवर दोन दिवसांपूर्वी भाजपच्या प्रदेश स्तरावरील ज्येष्ठ नेत्यांनी दोन दिवसांपूर्वी पुण्यात संगा यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट घडविली. यावेळी या दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली.

 

 विडी-यंत्रमाग उद्योगाचे तसेच कामगारांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी, नवीन उद्योग धंदे आणून रोजगार निर्मिती करण्यासाठी आपण तुमच्या पाठीशी राहू असे आश्‍वासन देत देवेंद्र फडणवीस यांनी देत आपल्याला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास विनंती केली. त्यानुसार आपण आज उमेदवारी मागे घेतल्याचे संगा यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.  सोलापूरच्या भवितव्यासाठी आपला लढा असून तो यापुढेही कायम राहील, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *