सीएए ‘ च्या समर्थनाचा संदेश देत वडार समाजाच्या गोविंदा पथकाने फोडली दहीहंडी…..

विजयी चौकात हजारो श्रीकृष्ण भक्तांची जमली मांदियाळी : दयावान ग्रुपतर्फे दहीहंडी उत्साहात…..

सोलापूर व्हिजन

सोलापूर, दि. २७ ऑगस्ट – नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (‘ सीएए ‘) च्या समर्थनाचा संदेश देत वडार समाजाच्या गोविंदा पथकाने दहीहंडी फोडत जल्लोष केला. बाळीवेस येथील विजयी चौकात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मंगळवारी दयावान ग्रुपतर्फे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते आणि समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.सीएए कायदा कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेत नाही. तर शेजारील राष्ट्रातील धार्मिक अत्याचारांना बळी पडलेल्या तेथील अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, ख्रिश्चन, पारशी अशा धर्मातील व्यक्तींना भारतीय नागरिकत्व देतो, असा संदेश या दहीहंडीच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या फलकाच्या माध्यमातून देण्यात आला. याकरिता परकीय व्यक्तींना भारतात येण्यासाठी बंदी असल्यामुळे केंद्र सरकारने शेजारील राष्ट्रातील धार्मिक अत्याचारांनी पीडित असलेल्या व्यक्तींना भारतात प्रवेश करण्यासाठी सीएए रुपी चावी प्रदान केल्याचा फलक या ठिकाणी लावण्यात आला होता. वडार समाजाच्या गोविंदा पथकाने पाच थराची मानवी मनोरे उभारत दहीहंडी फोडली.

यावेळी व्यासपीठावर संयोजक दयावान ग्रुपचे संस्थापक आणि माजी नगरसेवक विनायक विटकर, माजी नगरसेवक आणि भाजपा शहर उपाध्यक्ष अनंत जाधव, माजी सभागृहनेते संजय कोळी, माजी नगरसेवक अमर पुदाले, राजकुमार पाटील, दयावान ग्रुपचे अध्यक्ष उत्सव अशोक अलकुंटे, मनसे नेते अश्विनकुमार पाथरूडकर, शहीद अशोक कामटे विचार मंचचे अध्यक्ष योगेश कुंदुर, सामाजिक कार्यकर्ते राजू हौशेट्टी, नागेश अलकुंटे, विजय पाटील, पापा दायमा, बाळू ओझा, सुशिलकुमार व्यास उपस्थित होते.

दहीहंडी उत्सव यशस्वी करण्यासाठी वैभव मुद्दे, साईनाथ भांडेकर, विशाल शिंगे, मनोज विटकर, सचिन अलकुंटे, सुहास अमरावतीकर, पंकज विटकर, प्रमोद भोसले, प्रवीण भोसले, देविदास इरकल, सुनिल यमपुरे, कुमार यमपुरे, उमेश इरकल, योगेश अलकुंटे, सचिन अलकुंटे आदीसह दयावान ग्रुप दहीहंडी उत्सव समितीचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *