दलित वस्ती योजनेतून शेकडो कोटींची कामे….डॉ. किरण देशमुख
आमदार देशमुख यांना निवडून देण्याचे केलं आवाहन…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर दि.१५ नोव्हेंबर –
महाराष्ट्र राज्याचे दिशा ठरवणार गतिमान सरकार निवडून द्यावं. केंद्रने राज्याच्या सुरू असलेल्या विविध योजनेचा लाभ नागरिक घेत आहेत. राजीव गांधी नगर भवानी पेठ या भागात झालेली विकास काम पाहून भाजपला मतदान करावं. 2014 नंतर या भागात अनेक मूलभूत सुविधांचे कामे झालेली आहेत आमदार देशमुख मालकांनी या भागात शेकडो कोटींचा निधी दिला तसेच राज्य सरकारच्या लाडकी बहिण योजनेतून आता २१०० रुपये देण्यात येणार आहे यासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांना निवडून देण्याचा आवाहन माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी यावेळी केले..यावेळी व्यासपीठावर माझी सभागृह नेते संजय कोळी, माजी नगरसेविका वंदना गायकवाड,एसबी प्रतिष्ठानचे संस्थापक सुधीर बिडबाग, अजित गायकवाड,राजाभाऊ काकडे,गौतम कसबे, शशी कांबळे, पिंटू ढावरे, नागेश येळमेली, रवी कोटमळे, अश्विनी गायकवाड, महेश गजदाने आदींची उपस्थिती होती.
आपल्या भागात आमदार देशमुख यांच्या माध्यमातून विकासाची गंगा आणली. गलिच्छ असलेला भाग आता सुधारला आहे. यासाठी आमदार देशमुख यांनी भरभरून निधी दिला. या भागातील बुद्ध विहार, अभ्यासिका आणि समाज मंदिर बांधण्यासाठी आमदार देशमुखांनी वेळोवेळी निधी दिला आहे. यासाठी आपल्या भागातील सर्व बहिणींनी आमदार देशमुखांना मतदान रुपी आशीर्वाद द्यावा असे आवाहन माजी नगरसेविका वंदना गायकवाड आणि पिंटू डावरे,प्रवीण कांबळे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एस बी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते परिश्रम घेतले. या कार्यक्रमास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.