चंद्राम चव्हाण गुरुजी माझे दैवत :- माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे

चंद्राम चव्हाण गुरुजींची प्रेरणा ज्योत प्रज्वलित राहिली पाहिजे – माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे 

चंद्राम चव्हाण गुरुजींनी अशिक्षित बंजारा समाजाला विकासाच्या प्रवाहात आणले – जलसंधारण मंत्री संजय राठोड 

दलित मित्र शिक्षण महर्षी चंद्राम चव्हाण गुरुजींच्या पूर्णाकृती पुतळ्याचे थाटात अनावरण…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१२ एप्रिल

भारत स्वातंत्र्य झाल्यावर देशाच्या विकासात जेवढे समाजसेवकांनी योगदान दिले आहे. तेवढेच योगदान स्व. चंद्राम चव्हाण गुरुजी यांनी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात केले आहे. गुरुजी हे माझे दैवत आहेत. त्यांच्या सामाजिक आणि राजकीय विचारांना वसा घेऊन मी, पोलीस अधिकारीचा राजकारणी बनलो. आपल्या बंजारा समाजाच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. गुरुजींनी बंजारा व इतर समाजास चेतना आणि प्रेरणा देण्याचे कार्य केले. शिक्षणापासून वंचित असणाऱ्या समाजाला प्रेरणा दिली. गुरुजींची हीच प्रेरणा ज्योत अखंडपणे प्रज्वलित राहिली पाहिजे, असे मत देशाचे नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. यावेळी व्यासपीठावर राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड, सुभाष चव्हाण, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, विश्वनाथ  चाकोते, भारत जाधव,माजी आमदार दत्तात्रय सावंत,सिद्धराम चाकोते,माजी आ.प्रकाश यलगूलवार, पंढरपूरचे बीपी रोंगे, माजी आमदार शिवशरण पाटील,बी के नाईक, मूर्तिकार विजय गुज्जर, आ.देवानंद चव्हाण, माजी न्यायाधीश नामदेव चव्हाण,चेतन नरोटे मान्यवरांच्या हस्ते कळ दाबून पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तदनंतर परिस्पर्श या चंद्राम चव्हाण गुरुजींच्या जीवनावर आधारित स्मरणिकेचे देखील मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रमुख मान्यवरांचा बंजारा समाजाची शाल, सन्मान चिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

      पुढे बोलताना शिंदे म्हणाले, गुरुजींच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना मन उचंबळून येते. साधी राहणी उच्च विचारसरणी अशी त्यांची ख्याती होती. जेव्हा मी सर्वप्रथम १९७४ रोजी मंत्री झालो. त्यामध्ये गुरुजींचा मोठे पाठबळ होते. राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक होते. ते देखील बंजारा समाजाचे होते. त्यांनी देखील सामान्य कार्यकर्त्याला मोठा आधार दिला. सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व सोलापूर जिल्ह्यातील शैक्षणिक धुरा सांभाळणारे तीन गुरुजी म्हणजे चंद्राम चव्हाण,जाधव गुरुजी,कमळे गुरुजी यांनी आपले ध्येय उद्देश पूर्ण करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले आहे.माझ्या सोबत माझ्या राजकीय प्रवासात माझे सहकारी होते.आज त्यांनी लावलेले रोपटे हे फळांनी बहरले आहे.याची चव संपूर्ण त्यांचा समाज घेत असून यापुढेही त्यांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी शिंदे कुटुंब प्रयत्न करणार आहे. असे सांगितले.

        दरम्यान, कार्यक्रमात राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी देखील आपले विचार व्यक्त करताना चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचे कौतुक केले. अशिक्षित, अज्ञानी, व्यसनाधीन असलेल्या बंजारा समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणले. शैक्षणिक संस्था स्थापन करून विद्यार्थ्यांना घडवले. समाजाला एक दिशा दिली. सर्वप्रथम त्यांनी शिक्षण घेऊन शिक्षकी पेशा अंगी बांधला आणि त्यापासून प्रबोधन कार्य सुरू केले. सोलापुरात शिक्षणाचे जाळे संस्थांच्या माध्यमातून निर्माण केले. गुरुजींच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यामुळे आज बंजारा समाज विकासाकडे वाटचाल करत आहे. असे सांगत त्यांच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले. यावेळी राठोड यांनी शासनाच्या विविध योजना तांड्यापर्यंत पोहोचवून शिक्षण गंगा घरोघरी नेण्याचे कार्य करणार असल्याचे सांगितले. तत्पूर्वी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मागास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी केले. यावेळी रवी चव्हाण, कार्तिक चव्हाण, सचिन चव्हाण, विवेक चव्हाण, किरण चव्हाण यांच्यसह बंजारा समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार निवृत्त न्यायाधीश नामदेव चव्हाण यांनी मानले. तर सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *