पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आखली रणनीती ; भाजप उमेदवारांसह कार्यकर्त्यांना दिले हत्तीचे बळ…

सोलापूर महापालिकेत भाजप ठरणार किंग 

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रणनीती आखत उमेदवारांसह कार्यकर्त्यांना दिले बळ 

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.४ डिसेंबर 

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर महानगरपालिका निवडणूकीसाठी रणनीती आखत बालाजी सरोवर येथे झालेल्या बैठकीत उमेदवारांसह कार्यकर्त्यांना बळ दिले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतः पालकमंत्री सोलापुरात तळ ठोकून आहेत. महापालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची होत असताना दिसत आहे. भाजप पक्षामध्ये घाऊक इनकमिंगनंतर मोठा गोंधळ निर्माण झाला. शहरातील विद्यमान आमदारांनी माझा कार्यकर्ता म्हणजेच पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असे समीकरण या निवडणुकीत केले. त्यामुळे भाजप पक्षामध्ये नाराजीनाट्य सुरू झाले. मात्र या दरम्यान, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याला छेद देत सोलापूर शहराचे राजकारण व्यक्तिकेंद्रित न करता पक्षकेंद्रित करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते.

गटातटाच्या राजकारणाकडे लक्ष न देता वरिष्ठांच्या भूमिकेनुसार पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माजी नगरसेवक शिवानंद पाटील आणि माजी नगरसेवक नरेंद्र काळे यांचा राजकीय बळी जाऊ न देता त्यांना न्याय देण्याचे काम केल्याचे दिसते. नरेंद्र काळे सारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाल्याने अनेकांना आनंद झाला आहे.

यंदा भाजपाची वाटचाल महापालिका निवडणुकीत मागील वेळेपेक्षा अधिक जास्त जागा मिळवण्याकडे सुरू झाली आहे, निवडणूक लागण्याच्या दिवशी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यंदा भाजप सोलापुरात जादुई आकड्याच्या पुढे जाईल अशी चर्चा केली जात आहे. २०१७ रोजी झालेल्या निवडणुकीत विरोधी पक्षातून आलेल्या तब्बल ४८ जणांना भाजपाकडून तिकिटांचे वाटप करण्यात आले होते. यंदाच्या निवडणुकीत मात्र भाजपाने पक्षातील मूळ कार्यकर्त्यांनाच अधिक संधी देण्याची ठाम भूमिका घेत केवळ २५ टक्केच तिकिटे बाहेरून पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांना दिली असल्याचे दिसून येत आहे.

विरोधी पक्षातून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेल्या नेत्यांना भाजपाने वेळीच सामावून घेतले नसते तर जनमानसात मोठा प्रभाव असलेले हे नेते भाजप विरोधी पक्षात जाऊ शकतात याचा अंदाज घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुरी नेत्यांची नाराजी पत्करून शहरातील विविध पक्षातून भाजपमध्ये येऊ इच्छिणाऱ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भाजपा प्रवेश दिला. ही बाब आता मात्र भाजपच्या पथ्यावर पडणारी दिसून येत आहे.

 

सोलापूरच्या या राजकीय हालचालींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असलेले बारीक लक्ष हे सोलापुरात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. पक्षातीलच काही नेते मंडळींनी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी संभ्रम निर्माण केल्याचा प्रयत्न दिसून येत आहे. या सर्व गोंधळानंतरही सगळ्या १०२ जागा लढवणारा पक्ष केवळ भारतीय जनता पार्टी ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *