दि ओन्ली अण्णा चषक : वीर मराठा संघ ठरला मानकरी ; तर आदर्श क्रिकेट क्लब संघ उपविजेता…

दि ओन्ली अण्णा चषक : वीर मराठा संघ ठरला मानकरी ; तर आदर्श क्रिकेट क्लब संघ उपविजेता

माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त २७ एप्रिल ते १ मे दरम्यान करण्यात आले होते भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.३ मे

सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विजापूर रोडवरील नेहरूनगर येथील शासकीय क्रीडांगण येथे २७ एप्रिल ते १ मे दरम्यान ईच्छा भगवंताची परिवार आणि नागेश अण्णा गायकवाड युथ फाऊंडेशनच्या वतीनं भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यात वीर मराठा संघ विजेता तर वैराग येथील आदर्श क्रिकेट क्लब उप विजेता ठरला.

     दरम्यान, या डे नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये १८ संघांनी सहभाग नोंदविला होता. दरम्यान सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत अंतिम फायनल सामन्यांची नाणेफेक करण्यात आली. अंतिम सामन्यामध्ये सोलापूर येथील वीर मराठा संघ मानकरी ठरला तर वैराग येथील आदर्श क्रिकेट क्लब हा उपविजेता संघ ठरला तर सोलापूर येथील ईसा इलेव्हन संघाने तिसरा क्रमांक पटकाविला. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, माजी नगरसेवक मनोज शेजवाल, गुरुशांत दुत्तरगावकर, किरण चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष उमेश जाधव, आदींच्या उपस्थितीत विजेता संघास पारितोषिक वितरण करण्यात आले.

 

      यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते सोलापूर येथील वीर मराठा संघास ८१,१११ रुपये रोख आणि चषक देण्यात आले तर वैराग येथील आदर्श क्रिकेट क्लब या उपविजेता संघास ४१,११ रुपये आणि चषक देण्यात आले तर तिसरा विजेता ईसा इलेव्हन संघास २१,१११ रुपये रोख आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आले. दरम्यान उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड यांनी केले.

    वाढदिवसाला क्रिकेट चषक जिंकणे ही एक आनंदी आणि विशेष घटना असू शकते अनेकदा स्थानिक क्रिकेट क्लब किंवा मित्रमंडळाने वाढदिवसाला खास स्पर्धा आयोजित करतात आणि यात जिंकणे एक घास अनुभव असतो काही वेळा व्यक्तीच्या नावावरून किंवा आवडीनुसार खास क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जाते आणि जिंकणारा मानकरी बनतो कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून खेळाडूंना प्रोत्साहन आणि संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य त्यांच्या मित्र परिवाराने केला आहे त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मनोगत यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केलं. दरम्यान यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत नागेश गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नागेश अण्णा गायकवाड युथ फाऊंडेशनच्या इनोग्रेशन सोहळा पार पडला.

        या क्रिकेट स्पर्धेचे समालोचन शंकर पवार डान्सिंग अंपायर म्हणून सोन्या बापू भोसले यांनी उपस्थिती लावली. याभव्य स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीर स्पर्धकास रोख रक्कम आणि चषक  वितरण करण्यात आले.सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नागेश अण्णा गायकवाड युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष अमोल जगताप चेतन गायकवाड दर्शन दुबे, प्रेम गायकवाड, कार्तिक जाधव, किरण शिंदे,दर्पण दुबे, सनी पोळ, नवीन चिंता, दिनेश आवटे, ऋषी येवले, सौरभ पातळे,सोनू पटेल, सोनू जाधव,पियुष गायकवाड, अजिंक्य जाधव, उत्कर्ष गायकवाड,आदर्श जाधव, पियुष गायकवाड यांच्यासह ईच्छा भगवंताची परिवाराचे पदाधिकारी आणि सदस्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *