खासदार बाईंनी केसांनी गळा कापला ; २५ लाखांची दिली ऑफर
आडम मास्तरांचा बॉम्बस्फोट…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.५ नोव्हेंबर– सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघावरून आता चांगलेच घामासाहान सुरू झाले आहे. एकेकाळी महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष असणारे माकपाने काँग्रेसवर आता आग पाखड सुरू केली आहे. लोकसभेमध्ये तुम्ही आमचे काम करा, विधानसभेला आम्ही तुम्हाला जागा देऊ असे आश्वासन देऊन सुद्धा काँग्रेसने विशेषतः खासदार प्रणिती शिंदे यांनी केसाने आमचा गळा कापला, माकापाचा विश्वासघात केला असा घाणाघात आरोप केला आहे.
यावेळी मास्तर म्हणाले की, पहाटे काँग्रेसचे माणसे येऊन पंचवीस लाखांची ऑफर देतात, पैसे घ्या आणि आमचे काम करा असे सांगतात असा बॉम्बस्फोट आडम मास्तर यांनी पत्रकार परिषदेत केला. रे नगर वसाहत बनवताना देखील काँग्रेसने सबसिडी कापण्याचे काम केले. १५०० कोटी सबसिडी मिळणार होती परंतु काँग्रेसमुळे ९०० कोटींची सबसिडी कमी झाली. गरिबांच्या तोंडाचा घास काढला. इतके पातक काँग्रेसने केले आहे. दुसरा चार्ज ठोकताना अडम मास्तर यांनी सांगितले की, ४८८ गाळे यांचा विषय अद्यापही प्रलंबित आहे. गळ्याचे कामकाज अद्याप्रकडले आहे त्यामुळे नागरिक खोक्यात राहत आहेत. त्याचप्रमाणे तिसरा चार्ज करताना मास्तर म्हणाले, कामगार पेन्शन साठी किमान वेतनासाठी तडफडू लागले आहेत. त्यांचा विषय मार्गी लावला जात नाही. प्रणिती शिंदे यांनी जिनी गिरणी येथे गाळे पाडण्याचा पराक्रम केला परंतु अकरा वर्षे झाले कुदळ मारून त्या ठिकाणी गाळे बांधलेले नाहीत.
आडम मास्तर यांना तिकीट दिले तर शहराचा ताबा आपल्या हातून जाईल. असे भीती शिंदे कुटुंबीयांना वाटते. विशेष करून खासदार बाईंनी याबाबत केसाने गळा कापला आमचा विश्वासघात केला असा आरोप करत मास्तर यांची अडचण त्यांना वाटत असेल त्यामुळे त्यांनी गेम केला आहे.
२५ लाख ऑफरचा बॉम्बस्फोट
दत्ता सुरवसे आणि बेसकर यांनी आम्हाला काँग्रेसचे काम करण्यासाठी २५ लाखांची ऑफर दिली. पहाटे पहाटे काँग्रेसची ही माणसे आमच्याकडे आली. परंतु आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. हा बॉम्बस्फोट आडम मास्तर यांनी यावेळी केला.