माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या विकास कामाचा सपाटा..

प्रभाग २६ मधील गीता नगर येथे काँक्रीट रस्त्याचे उद्घाटन
सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.४ नोव्हेंबर
शहराच्या हद्दवाढ भागातील प्रभाग क्रमांक २६ मधील गीता नगर येथे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली विकासकामे अखेर पूर्णत्वास गेली आहेत. पाण्याची पाईपलाईन, अंतर्गत रस्ते ड्रेनेज लाईन नसल्यामुळे नागरिकांना असंख्य त्रासाला सामोरे जावे लागत होते. मात्र येथील माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी राज्य शासनाच्या सुवर्ण जयंती नगरोस्थान योजनेतून अंतर्गत ड्रेनेज लाईन करण्यासाठी सोलापूर महापालिका आयुक्त यांना निवेदन दिले होते. त्याची दखल घेऊन आयुक्त डॉ.सचिन ओंबसे यांनी ड्रेनेज लाईन कामकाजासाठी निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर येथील बाधित नगरात सिमेंट कॉंक्रीट रस्त्याच्या कामाचे उद्घाटन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली.

दरम्यान प्रभागाच्या माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी शासन दरबारी व सोलापूर महापालिका येथे पाठपुरावा करून प्रथम पिण्यासाठी पाण्याची पाईपलाईन त्यानंतर ड्रेनेज लाईनचे काम झाले. आता सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम प्रत्यक्ष चालू केलेले आहे. त्यामुळे समस्यांचे निराकरण झाल्याचे मनोगत येथील नागरिकांनी व्यक्त केले.
यावेळी संग्रामसिंह चव्हाण, दिगंबर पुकाळे, जगन्नाथ काळे, प्रशांत काळे, मीरा मोकाशी, पार्वती गायकवाड, प्रभा क्षीरसागर, शोभा सोलापुरे, सरस्वती काळे, तसेच भाजपाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण, ठेकेदार प्रसन्न जाधव, आदी उपस्थित होते.