सोलापूर शहरात संविधान जागर यात्रा…….
सोलापूर व्हिजन
सोलापूर प्रतिनिधी – संविधान जागर समिती महाराष्ट्र आयोजित संविधानाच्या अमृत महोत्सवा निमित्त संविधान जागर यात्रा २०२४ जाहीर सभेस आ.विजय देशमुख, वाल्मिक निकाळजे, राजेंद्र गायकवाड, नितीन मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी संविधान जागर यात्रेत संविधान वाचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. भाजपला संविधान बदलण्याच्या कारणावरून नेहमीच टार्गेट केले जात आहे. मात्र तसे कोणतेही घटना घडली नाही. विरोधक केवळ याला स्टंट करत असल्याचे सांगण्यात आले…
यावेळी शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष जाकीर सगरी, सरचिटणीस प्रा. नारायण बनसोडे, अजित भाऊ गायकवाड, राजाभाऊ काकडे, एस सी आघाडीचे प्रवीण कांबळे, अजित गादेकर, राजाभाऊ माने, गौतम कसबे, बाळासाहेब आळसंदे, मारेप्या कंपली, बाबुराव संगेपाक, भीमराव असादे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते..