दक्षिण विधानसभेसाठी बाबा मिस्त्री यांनी काँग्रेस पक्षाकडे सादर केला अर्ज..!
मतदारांच्या जोरावर उतरणार निवडणुकीत – बाबा मिस्त्री
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि २७ जुलै – विधानसभा सार्वत्रिक निवडणूकिसाठी २५१- दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून मौलाली सय्यद बाशुमिय्या (बाबा मिस्त्री) यांनी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकित काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागणीचा अर्ज शनिवार दिनांक २७ जुलै २०२४ रोजी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे काँग्रेस भवन सोलापूर येथे सादर केला.
यावेळी बाबा मिस्त्री यांनी मागील निवडणुकीचा अनुभव गाठीशी बांधून काँग्रेस कडून उमेदवारी अर्ज भरला आहे. मागील निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे प्रतिस्पर्ध्यांना चांगली लढत त्यांनी दिली आहे. ग्रामीण भागातील मतांच्या जोरावर यंदा निवडणूक लढवू रुग्णसेवक म्हणून ग्रामीण भागात ओळख निर्माण झाली आहे त्याचा फायदा या निवडणुकीत नक्कीच होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.यावेळी अब्दुल पठाण, बुरहान मुल्ला, अझर शेख, किसन मेकाले, तिरुपती परकीपंडला , भीमाशंकर टेकाळे, एन.के. क्षीरसागर, विजय शाबादी, शिरीष जाधव, सलीम मणूरे, राजू गडदे, मोहसीन फुलारी, महादेव येरनाळ, यतिश देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सोलापूर मधील आरोग्य यंत्रणा सुधारण्यास प्रयत्न करू.
गेल्या पाच टर्म पासून नगरसेवक म्हणून काम करतो आहे. ग्रामीण भागात माझी एक रुग्णसेवक म्हणून वेगळी प्रतिमा निर्माण झाली आहे. त्याचा फायदा मला होणार आहे. सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यास येणाऱ्या रुग्णांना नेहमीच सहकार्य असते. शेतकरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा निर्माण करून देऊ. तसेच वारकऱ्यांसाठी एक हॉस्पिटल देखील उपलब्ध करून देऊ असा विश्वास व्यक्त करतो. जर का पक्षाने या वेळेस देखील संधी दिली तर आणखीन जोमाने काम करू.
– बाबा मिस्त्री, माजी नगरसेवक तथा इच्छुक उमेदवार