तीस वर्षांच्या एकनिष्ठतेचे फळ दक्षिणच्या उमेदवारी स्वरूपात मिळावे ; सुरेश हसापुरे यांनी व्यक्त केली आशा..
पडत्या काळात अनेकांनी पक्षाची साथ सोडली परंतु तीस वर्षांपासून मी पक्षासोबत एकनिष्ठ :- सुरेश हसापूरे
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि ३० जुलै – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापूरे यांनी काँग्रेस पक्षाकडून रितसर उमेदवारी मागणीचा अर्ज सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे काँग्रेस भवन सोलापूर येथे सादर केला.
यावेळी बोलताना सुरेश हसापुरे यांनी गेल्या तीस वर्षांपासूनचा लेखाजोखा मांडला. तीस वर्षांपासून एकनिष्ठतेने काँग्रेस पक्षासोबत आहे. पक्षाच्या उतरत्या काळात अनेकांनी पक्ष सोडला, मात्र मी पक्षासोबत राहिलो, दक्षिण सोलापूर तालुक्यात संघटना वाढवली. काँग्रेस पक्ष तालुक्यात जिवंत ठेवला. विविध कामे या निमित्ताने केली आहेत. त्यामुळे रीतसर पद्धतीने या मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठीकडे अर्जाद्वारे मागणी केली आहे.
दरम्यान यावर जेष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे , नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे वरिष्ठ अंतिम निर्णय घेतील, उमेदवारी दिली किंवा नाही दिली तरीही मी काँग्रेस पक्षाचे काम करत राहीन. परंतु एकनिष्ठ कार्यकर्त्याच्या भावनांचा आदर करत माझ्या अर्जाचा जाणीवपूर्वक विचार व्हावा असे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.
यावेळी संगमेश बगले, मोतीराम राठोड, बनसिद्ध बन्ने, तिरुपती परकीपंडला, सुभाष पाटोळे, जयशंकर पाटील, संतोष पवार, श्याम व्हनमाने, शिवलिंग बगले, सुधाकर जोकारे, केरू बंडगर, विश्वनाथ जोकारे, सागर उबाळे, सुभाष वाघमारे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.