मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा 10% आरक्षण अध्यादेश गुलालाचा अपमान केला – युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरेंचे अमोल शिंदेंना प्रत्युत्तर
सोलापूर व्हिजन
सोलापूर दिनांक:- शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे खासदार प्रणिती शिंदे यांच्या वर आरोप करण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई मध्ये मनोज जरांगे पाटील यांच्याकडे दिलेल्या 10% मराठा समाज फसवा अध्यादेश काढून गुलालाचा अपमान केला आहे.याचे उत्तर प्रथम त्यांनी द्यावे असे गणेश डोंगरे यांनी सुनावले खडेबोल
सोलापूर दिनांक :- लोकसभा निवडणुक पूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षण लढाई चालू होती.आंतरवाली सराटी ते मुंबई पायी चालत मोर्चा नवी मुंबईत पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री यांनी 10% मराठा आरक्षण अध्यादेश परिपत्रक जरांगे पाटील यांना दिले व विधानभवनावर जाणारा मोर्चा थांबवला व गुलालाची उधळण केली.जल्लोषात मराठा समाज मोर्चा शांत झाला.परंतु दुसर्या दिवशी मराठा समजा अध्यादेश फसवे निघाले समजल्यानंतर मराठा समाज्यात संतापाची लाट पसरली. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-महाविकास आघाडी 48 पैकी 32 जागा जिंकल्यानंतर मराठा समाजावर आक्रोश काढण्याचा प्रयत्न भाजपा सेना महायुती करत आहे.कालच मराठा समाजासाठी असलेले अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळातील 61 कर्मचारी सुट्टीदिवशी महामंडळ अध्यक्ष कोणतीही पूर्वकल्पना न देता तडकाफडकी काढून टाकले.मराठा बांधवाना बँक मधून दिलेल्या कर्ज व्याज परतावा बंद करून टाकले. 10% दिलेले मराठा आरक्षणामध्ये वैद्यकीय प्रवेशप्रक्रिया लाभ नाही व 11 वी प्रवेशप्रक्रिया संपूर्ण महाविद्यालयात चालू आहे.त्याठिकाणी सुध्दा आरक्षण नाही.मराठा समाजाची खरी फसवणूक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फसवे आरक्षण देऊन केली आहे. खासदार प्रणिती शिंदे हे विजयी झाल्यानंतर गाव भेट दरम्यान पंढरपूर,मोहोळ येथे मनोगतात म्हणाले मनोज जरांगे यांच्यामुळे निवडून आले मराठा समाजाची एक गठ्ठा मतदान कॉंग्रेस पक्षाला झाले.असे बोलणारे एकमेव खासदार प्रणिती शिंदे हे आहेत.उपोषण ठिकाणी प्रणिती शिंदे जाण्यापूर्वी एक दिवस अगोदर उपोषण सोडले गेले.प्रणिती शिंदे मनोज जरांगे यांना भेटायला जाणार आहेत.हि भेट आपल्यामुळे घेतले याचे श्रेय घेण्यापेक्षा सोलापूर,माढा लोकसभा पराभव कसा झाला याचे आत्मपरीक्षण जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी करावे असे खडेबोल काँग्रेसयुवक आध्यक्ष गणेश डोंगरे यांनी सुनावले आहेत.