खा. प्रणिती शिंदे यांनी केला महायुती सरकारवर हल्लाबोल….. सिंधुदुर्ग घटनेवरून झाल्या आक्रमक

सिंधुदुर्ग घटनेवरून महाविकास आघाडी आक्रमक….

खा. प्रणिती शिंदे यांनी केला महायुती सरकारवर हल्लाबोल…..

सोलापूर व्हिजन 

सोलापूर, दि. २८ ऑगस्ट – सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचे पडसाद सोलापुरात उमटले. बुधवारी सोलापूर जिल्हा परिषदेच्या पुनम गेट समोर काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने एकत्रित निषेध आंदोलन केले.

      या घटनेने आक्रमक झालेल्या महाविकास आघाडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनामाची मागणी केली. तर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आणि पदाधिकारी यांनी आपल्या भाषणातून तीन पक्षाच्या सरकारवर टीका करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी केली.

 काँग्रेसच्या खा. प्रणिती शिंदे यांनी या आंदोलनाला उपस्थिती दर्शवून त्यांनी सदरच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याच्या विषयावरून हे सरकार वरून केवळ शोबाज आहे, आणि आतून पूर्णपणे पोकळ असल्याचे टीका त्यांनी यावेळी केली. त्यामुळे त्यांच्या आता कोणत्याही योजना चालणार नाहीत जनतेच्या लक्षात आलेले आहे हे सरकार आता महाराष्ट्रातून हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही या शब्दात त्यांनी महायुतीच्या सरकारवर तोफ डागली.

या आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे,  राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल, शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णू कारमपुरी, शहरप्रमुख महेश धाराशिवकर, उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, विजय पुकाळे, काँग्रेसचे माजी नगरसेवक विनोद भोसले, डी ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, सुशील बंदपट्टे, सुदीप चाकोते, हेमा चिंचोळकर, राष्ट्रवादीचे विजय भोईटे, सेनेचे लहू गायकवाड, माजी नगरसेविका फिरदौस पटेल, तिरुपती परकीपंडला आदींसह  पदाधिकारी, माजी नगरसेवक, विविध सेलचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *