Congress party conduct the assembly election form submission ; काँग्रेसने लढवलेली शक्कल येत आहे कामी !

Congress party conduct the assembly election form submission ; काँग्रेसने लढवलेली शक्कल येत आहे कामी ! ” उत्तर ” मध्य” अन् “दक्षिण” साठी वीस हजार होतायत फिक्स डिपॉझिट  

  • सोलापूर व्हिजन

सोलापूर दि १ ऑगस्ट – विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्यावतीने अधिकृत पद्धतीने उमेदवारी अर्जाची विक्री सुरू केली आहे. या अर्जच्या विक्रीतून आता चांगला दाम मिळत आहे. अर्ज सादर करण्यासाठी काँग्रेस भवनमध्ये इच्छुकांची भाऊ गर्दी वाढलेली दिसत आहे. शहरातील उत्तर मध्य आणि दक्षिण या तीनही विधानसभे च्या जागेसाठी अनेकांनी निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची मोट बांधण्यास सुरुवात केलेली दिसत आहे.

          दरम्यान काँग्रेस पक्षाच्या वतीने यंदाच्या वर्षी सोलापूर शहर जिल्ह्यातील 11 विधानसभा जागेसाठी इच्छुकांची यादी मागवली आहे. काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी आमदारकीची निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसकडून इच्छुक आहे. त्यांनी सर्वसाधारण खुला किंवा राखीव मतदारसंघासाठी प्रती अर्ज वीस हजार आणि दहा हजार रुपये शुल्क भरून अर्ज सादर करावयाचा आहे. अर्ज सादर करण्यावेळेसच सदरचे शुल्क काँग्रेस कमिटी आणि संबंधित मतदार संघाानुसार शहर अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्याकडे सुपूर्द करावयाचा आहे. त्यानुसार ” शहर उत्तर “शहर मध्य” आणि” शहर दक्षिण” या शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघासाठी अनेक इच्छुकांनी मैदानात उतरण्याचा निश्चय केला आहे.

     इच्छुकांची वाढलेली भाऊगर्दी लक्षात घेता प्रत्येक इच्छुक उमेदवारांनी वीस हजार आणि दहा रुपये काँग्रेस कमिटीकडे जमा केल्याने काँग्रेस कमिटीच्या तिजोरीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसने लढवलेली शक्कल खरोखरच कामी येत आहे. अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *