२५ लाखांची दिली ऑफर आडम मास्तरांचा बॉम्बस्फोट ;  बिनबुडाचे आरोप करणे चुकीचे खा. प्रणिती शिंदे यांचे मास्तरांना प्रत्युत्तर…!

खासदार बाईंनी केसांनी गळा कापला ; २५ लाखांची दिली ऑफर आडम मास्तरांचा बॉम्बस्फोट ;

 बिनबुडाचे आरोप करणे चुकीचे खा. प्रणिती शिंदे यांचे मास्तरांना प्रत्युत्तर…!

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.५ नोव्हेंबर- सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघावरून आता चांगलेच घामासान सुरू झाले आहे. एकेकाळी महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष असणारे माकपाने काँग्रेसवर आता आग पाखड सुरू केली आहे. लोकसभेमध्ये तुम्ही आमचे काम करा, विधानसभेला आम्ही तुम्हाला जागा देऊ असे आश्वासन देऊन सुद्धा काँग्रेसने विशेषतः खासदार प्रणिती शिंदे यांनी केसाने आमचा गळा कापला, माकापाचा विश्वासघात केला असा घाणाघात आरोप केला आहे.  यावेळी मास्तर म्हणाले की, पहाटे काँग्रेसचे माणसे येऊन पंचवीस लाखांची ऑफर देतात, पैसे घ्या आणि आमचे काम करा असे सांगतात, असा बॉम्बस्फोट आडम मास्तर यांनी पत्रकार परिषदेत केला.

   दरम्यान रे नगर वसाहत बनवताना देखील काँग्रेसने सबसिडी कापण्याचे काम केले. १५०० कोटी सबसिडी मिळणार होती, परंतु काँग्रेसमुळे ९०० कोटींची सबसिडी कमी झाली. गरिबांच्या तोंडाचा घास काढला. इतके पातक काँग्रेसने केले आहे. दुसरा चार्ज ठोकताना अडम मास्तर यांनी सांगितले की,  ४८८ गाळे यांचा विषय अद्यापही प्रलंबित आहे. गळ्याचे कामकाज अद्याप रखडले आसून त्यामुळे नागरिक खोक्यात राहत आहेत. त्याचप्रमाणे तिसरा चार्ज करताना मास्तर म्हणाले, कामगार पेन्शन साठी किमान वेतनासाठी तडफडू लागले आहेत. त्यांचा विषय मार्गी लावला जात नाही. प्रणिती शिंदे यांनी जिनी गिरणी येथे गाळे पाडण्याचा पराक्रम केला परंतु अकरा वर्षे झाले कुदळ मारून त्या ठिकाणी गाळे बांधलेले नाहीत.

  आडम मास्तर यांना तिकीट दिले तर शहराचा ताबा आपल्या हातून जाईल. असे भीती शिंदे कुटुंबीयांना वाटते. विशेष करून खासदार बाईंनी आमचा विश्वासघात केला, असे आरोप करत आमची अडचण त्यांना वाटत असेल त्यामुळे त्यांनी गेम केला आहे. असे ही ते यावेळी म्हणाले. या पत्रकार परिषदेस बशीर शेख, एम एच शेख, अशोक इंदापुरे, कंदीकटला, युसुफ मेजर शेख, अनिल वासम आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेसने २५ लाखांची ऑफर दिली.

दत्ता सुरवसे आणि बेसकर यांनी आम्हाला काँग्रेसचे काम करण्यासाठी २५ लाखांची ऑफर दिली. पहाटे पहाटे काँग्रेसची ही माणसे आमच्याकडे आली. परंतु आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत.

– आडम मास्तर, उमेदवार शहर मध्य विधानसभा मतदारसंघ.

बिनबुडाचे आरोप करून आडम मास्तर यांना काय साध्य करायचे आहे ?

मी त्यांचा नेहमीचा आदर करते, यापुढे नेहीमच करत राहीन. पण आता या घडीला असे बिनबुडाचे आरोप करून त्यांना काय साध्य करायचे आहे. हेच कळत नाही.

– प्रणिती शिंदे, खासदार प्रणिती शिंदे 

याबाबत मला काही माहिती नाही 

आडम मास्तरांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. याबाबत मला काहीही माहिती नाही. ज्यांनी ऑफर घेऊन आले आहेत त्यांनाच खरे खोटे विचारा. 

– चेतन नरोटे, उमेदवार शहर मध्य विधानसभा मतदारसंघ.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *