सकाळी काँग्रेसच्या पदयात्रेत तर रात्री एम.आय.एम.च्या गोटात ; शौकत पठाण 

सकाळी काँग्रेसच्या पदयात्रेत तर रात्री एम.आय.एम.च्या गोटात ; शौकत पठाण 

काँग्रेस पक्षात नाराज असलेले शौकत पठाण यांनी पत्ता केला ओपन….

पक्ष बदल दलबदल प्रक्रियेला आला ऊत ; विधानसभा निवडणूक बनली कांटेदार

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१३ नोव्हेंबर –

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातून शहर मध्ये विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी न मिळाल्यामुळेनाराज असलेले शौकत पठाण यांनी एम आय एम पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांच्या प्रमुख उपस्थितीत  शहर मध्य विधानसभाचे उमेदवार फारूक शाब्दि यांना जाहीर पाठिंबा देत काँग्रेस वाल्यांना धक्का दिला आहे.

सकाळी काँग्रेस पक्षाचे शहर मध्य विधानसभाचे उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचार रॅलीत आणि पदयात्रेत प्रत्यक्ष सहभाग नोंदवून रॅलीचे प्रतिनिधित्व करत होते. आपल्याच प्रभागात सदरची रॅली काढून प्रचार केला. तदनंतर रात्री एमआयएम पक्षाच्या स्टेजवर जाऊन फारूक शाब्दि यांना जाहीर पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

       दरम्यान शौकत पठाण यांच्या या भूमिकेमुळे शौकत पठाण यांचे चालले आहे तरी काय? असा प्रश्न उद्भवत आहे. एकीकडे नाराजी दूर झाली असे म्हणत काँग्रेस पक्षात पुन्हा सक्रिय होणे, काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार चेतन नरोटे यांचा पुढाकाराने प्रचार करणे, त्यानंतर रात्री अचानक एम आय एम पक्षाच्या गोटात जाणे, या सर्व राजकीय घडामोडींमुळे काँग्रेस पक्षाला जोरदार धक्का बसलेला आहे. शौकत पठाण यांच्या या भूमिकेमुळे अगोदरच अडचणीत असलेले काँग्रेस आता आणखीन अडचणीत आलेली आहे. नाराजी दूर करता करता काँग्रेस श्रेष्ठींना नाकी नऊ येत असताना, शौकत पठाण यांच्या या नव्या भूमिकेमुळे राजकीय समीकरण बदलण्याचे संकेत वर्तवले जात आहेत.

शौकत पठाण यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

शौकत पठाण यांच्या या भूमिकेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क केला असता, संपर्क होऊ शकला नाही. ऐन मोक्याच्या क्षणी शौकत पठाण यांनी आपला पत्ता ओपन केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चेला उधाण आले आहे. 

पठाण यांची नाराजी दूर केली होती :- चेतन नरोटे 

सकाळी काढण्यात आलेल्या पदयात्रेत चेतन नरोटे यांनी सांगितले की, शौकत पठाण यांची आम्ही नाराजी दूर केली आहे. ते आमच्या सोबत आहेत त्यांच्या नेतृत्वाखालील पदयात्रा काढण्यात आलेली आहे, अशी माहिती चेतन नरोटे यांनी दिली होती. मात्र रात्री वेगळ्याच प्रकारचे चित्र दिसून आले. पठाण थेट एम आय एम पक्षाच्या गोटात जाऊन पाठिंबा दिल्याचे दिसून आले.

दलबदल प्रक्रियेला आला ऊत ; निवडणूक बनणार काटेदार ?

सध्याच्या घडीला राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघत आहे. हुकमी एक्का जवळ ठेवून अनेक राजकीय नेते आपले स्व:हीत साधत आहेत. विधानसभा निवडणुकीत यामुळे दलबदल प्रक्रियेला मोठा ऊत आलेला दिसत आहे. दबाव तंत्र निर्माण करत, नेतेमंडळी आपली पोळी भाजून घेत आहेत का ? असा प्रश्नचिन्ह आता निर्माण होत आहे. दल बदलू नेत्यांच्या या भूमिकेमुळे निवडणूक आता आणखीन काटेदार बनणार असल्याचे चित्र दिसत आहे. ? दलित, मुस्लिम आणि पद्मशाली मतांच्या गोळाबेरजेसाठी नेते मंडळींना आणि उमेदवारांना काय काय करावे लागणार आहे ? आणि नागरिकांना या निवडणुकीत अजून किती अन काय काय पाहावे लागणार आहे, हे येणारा काळच ठरवेल ! 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *