जनतेच्या अडीअडचणी सोडवल्या यापुढे देखील सोडवत राहू – सुशील बंदपट्टे ; माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते सुशील बंदपट्टे यांना कार्याध्यक्ष पत्र प्रदान

काँग्रेस कमिटी शहर “कार्याध्यक्षपदीसुशील बंदपट्टे यांची निवड ; सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते निवडीचे पत्र सुपूर्द…

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते सुशील बंदपट्टे यांना कार्याध्यक्ष पत्र प्रदान करताना…

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर / प्रतिनिधी

सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या शहर कार्याध्यक्ष पदी सुशील बंदपट्टे यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या शिफारसी नुसार, तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष खासदार प्रणिती शिंदे यांच्या सूचनेनुसार सुशील बंदपट्टे यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले.

सुशील बंदपट्टे यांनी काँग्रेस पक्षात एकनिष्ठ राहून काम केले आहे. चंद्रनील फाउंडेशन च्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवले आहेत. काँग्रेसमध्ये एकनिष्ठ राहून कोणत्याही पदाची अपेक्षा न करता लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे, यापुढे देखील आपण काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असून, तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम करणार असल्याचे नुतन कार्याध्यक्ष सुशील बंदपट्टे यांव सांगितले.

यावेळी काँग्रेन कमिटी शहर अध्यक्ष चेतन नरोटे, दत्ता सुरवसे, सुनीन रसाळे, गणेश डोंगरे, राजाभार कलकेरी, दीपक जाधव, महे अलकुंटे, दत्तात्रय अलकुंटे , संतोष इरकल, गोपाठ पाथरूट, श्याम मुद्दे, अशो यमपूरे, भीमाशंकर बंदप श्रीनिवास यमपूरे, जयवं यमपूरे, राहुल भरले, अति अलकुंटे कुणाल भांडेकर, नरें अलकुंटे समस्त वडार समाज व चंद्रनील मित्र परिवाराती सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *