नीम का पत्ता कडवा है…! आमित शहा…. है च्या घोषणांनी दणाणले परिसर !
बाबासाहेबांच्या आवामानाबद्दल काँग्रेस आक्रमक
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१८ डिसेंबर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल काँग्रेस कमिटीने काँग्रेस भवन समोर जोडेमार आंदोलन केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून त्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपमानकारक वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचा पडसाद सोलापूर शहरात आहेत. काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन समोर जोरदार निदर्शने करत निषेध नोंदवण्यात आला. यावेळी विविध घोषणा देऊन अमित शहा यांचा प्रतीकात्मक पुतळा आणून त्याला जोडे मारण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळी पोलीस आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये झटापट झाली.
परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्रत्येकात्मक पुतळा तात्काळ हिसकावून घेण्यात आला. यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी काँग्रेस भवन परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर संजय हेमगड्डी, सेवादलचे भीमाशंकर टेकाळे, माजी नगरसेवक विनोद भोसले, काँग्रेस युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, परशुराम सत्तारवाले, आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
अमित शहा यांच्या “त्या”वक्तव्याचा जाहीर निषेध.
केंद्रातील भारतीय जनता पार्टीचे सरकार जाणीवपूर्वक महापुरुषांचा अवमान करण्याचा प्रयत्न करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल बदनामी कारक वक्तव्य करून देशात वेगळे वळण लावण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु काँग्रेस पक्ष हेच कदापी सहन करणार नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्य प्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांनी माफी मागून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी नरोटे यांनी केली.
चेतन नरोटे, शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी.