सोलापूर शहर मध्य मतदारसंघात घमासान होणार !
बाबा मिस्त्री यांच्या शहर मध्य मतदारसंघातील उमेदवारीला पक्षांतर्गत कडाडून विरोध

काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना काँग्रेस भवनात भेटून दर्शवला विरोध !
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. २३ ऑक्टोंबर – सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघांमध्ये याच मतदारसंघामधील निष्ठावंत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितलेली असताना त्यांना डावलून दक्षिण सोलापूर विधानसभेसाठी इच्छुक असलेले माजी नगरसेवक मौलाली उर्फ बाबा मिस्त्री यांना जाणीवपूर्व शहर मध्य विधानसभा मतदारसंघांमधून काँग्रेसकडून उमेदवारी लादण्यात येत आहे. बाबा मिस्त्री यांनी खऱ्या अर्थाने दक्षिणमधून उमेदवारीसाठी मागणी केली होती.
दरम्यान शहर मध्य मतदारसंघातून आपण निवडणूक लढविणार नसल्याचे मिस्त्री यांनी जाहीर केले होते.मात्र आता बाबा मिस्त्री यांनी यू टर्न घेत सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघांमधून काँग्रेस पक्षाकडून त्यांनी उमेदवारी अर्ज नेला आहे. बाबा मिस्त्री यांचे शहर मध्य मतदार संघातील नेमके योगदान काय ? असा सवाल करत त्याला विरोध दर्शवण्यात येत आहे. यावेळी माजी महापौर आरिफ शेख, माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी, माजी नगरसेविका फिरदोस पटेल, शौकत पठाण, शकील मौलवी आदीजण काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.