तिघाडी सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेवर केला चिखलफेक …..विविध घोषणा देत काँग्रेसने व्यक्त केला निषेध…

केंद्रातील खिचडी सरकार व राज्यातील तिघाडी सरकार कोणाच्याच मागणीकडे लक्ष देत नाही कारण सरकार आंधळे, बहीरे, मुके आहे….का उपस्थित केला जातोय सवाल

सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने मुके बहिरे, भाजप, एकनाथ शिंदे, अजित पवार प्रणित तिघाडी सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेवर केला चिखलफेक …..विविध घोषणा देत व्यक्त केला निषेध…

सोलापूर दिनांक

भाजप, एकनाथ शिंदे, अजित पवार प्रणित तिघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनता विरोधी, शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने  जिल्हा परिषद पूनम गेट सोलापूर येथे तिघाडी सरकारच्या प्रतिमेवर चिखलफेक करून निषेध करण्यात आला.

यावेळी केंद्रातील मोदी खिचडी सरकार राज्यातील तिघाडी सरकारच्या निषेधाच्या जोरजोरात घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान राज्यातील भाजप- एकनाथ शिंदे-अजित पवार सरकारच्या नाकर्तेपणामुळे सर्वसामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार, तरुण, विद्यार्थी महिला, सर्वसामान्य नागरिकांसह कोणत्याही घटकाला दिलासा देऊ शकले नाही. महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली, नोकर भरती होत नाही उलट महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवून नेले जात आहेत. शेतकऱ्यांचा शेतीमालाला हमीभाव मिळत नाही, शेतीला लागणाऱ्या साहित्यांचे भाव प्रचंड वाढले, कायदा सुव्यवस्था बिघडली असून महिलांवर अत्याचार वाढले आहेत. सरकारच्या आश्रयाने लाखो रुपये घेऊन स्पर्धा परीक्षांचे, प्रवेश परीक्षांचे पेपर फोडले जात आहेत. यामुळे मेरिट मधील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. असे अनेक घटना घडत असताना सुद्धा केंद्रातील खिचडी सरकार आणि राज्यातील तिघाडी सरकार मुके बहिरे आंधळे होऊन बघत आपल्याच राजकारणात व्यस्त आहेत. जातीधर्मात तेढ निर्माण करून आपले अपयश झाकण्याचे काम करत आहे. म्हणून सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध करण्यासाठी चिखलफेक आंदोलन करण्यात आल्याचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी सांगितले. यावेळी आंदोलनात, महिला अध्यक्ष  प्रमिला तूपलवंडे, नगरसेविका परवीन इनामदार, भीमाशंकर टेकाळे, अंबादास बाबा करगुळे, दत्तू बंदपट्टे, जुबेर कुरेशी, उमेश सुरते, उदयशंकर चाकोते, हणमंतू सायबोलु, नागनाथ कदम, केशव इंगळे, हेमा चिंचोलकर, सुशील बंदपट्टे,  तिरुपती परकीपंडला, अनिल मस्के, अशोक कलशेट्टी, प्रवीण वाले, सागर उबाळे, संजय गायकवाड, शिवशंकर अंजनाळकर, वशिष्ठ सोनकांबळे, रुपेश गायकवाड, लखन गायकवाड, परशुराम सतारेवाले, नागेश म्याकल, कुणाल घोडके, सुभाष वाघमारे, रुस्तम कंपनी, राजेश झंपले, दाऊद नदाफ, सिद्राम अत्तेलुर, नागेश म्हेत्रे, रमेश जाधव, राहुल वर्धा, श्रीशैल रणधिरे, विवेक कन्ना, राजेंद्र शीरकुल, धीरज खंदारे, महेंद्र शिंदे, सुमन जाधव, मुमताज तांबोळी, शुभांगी लिंगराज यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *