जिल्हाधिकारी महसूल बीट पत्रकार संघ
अध्यक्षपदी अविनाश गायकवाड; सचिवपदी मनोज हुलसुरे
निवडीनंतर जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केले अभिनंदन..
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.११ फेब्रुवारी-
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय महसूल बीट पत्रकारांची बैठक जेष्ठ पत्रकार तथा अधिस्वीकृती समिती सदस्य प्रमोद बोडके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीत महसूल बीट पत्रकार संघाची निर्मिती होवून अध्यक्षपदी अविनाश गायकवाड आणि सचिवपदी इन सोलापूर न्यूज चॅनलचे प्रतिनिधी मनोज हुलसुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दरम्यान, या निवडीनंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांनी अभिनंदन करून शुभेच्या दिल्या.
या बैठकीचे प्रास्ताविक जेष्ठ पत्रकार बोडके यांनी केले. अविनाश गायकवाड यांचे अध्यक्षपदासाठी आणि सचिवपदासाठी मनोज हुलसुरे यांच्या नावाचा प्रस्ताव संतोष आचलारे आणि संगमेश जेऊरे यांनी मांडला.
याला अनुमोदन पत्रकार बाळकृष्ण दोड्डी, दीपक सोमा यांनी दिले. यावेळी पत्रकार सर्वश्री एजाज मुजावर, मनोज व्हटकर, बाळकृष्ण दोड्डी, हरिभाऊ कदम, महेश पांढरे, शिवाजी सुरवसे, संतोष आचलारे, दीपक सोमा, मनोज भालेराव, प्रशांत कटारे, विष्णू सुरवसे यांच्यासह महसूल बीट पत्रकारांची उपस्थिती होती.