सोलापूर शहरातील हजारो दलित महिलांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मानले आभार
सोलापूर दी २९ जून –
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आनंद चंदनशिवे यांच्या पुढाकारातून महिलांनी फटाक्याची आतिषबाजी करून मिठाई वाटून केला जल्लोष…..
सोलापूर दि. २९ जून – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करीत असताना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना लागू केली. या योजनेचा गोर गरीब जनतेला मोठा आधार मिळणार आहे. त्याबद्दल बुधवार पेठ, मिलिंद नगर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर आदींसह विविध परिसरातील महिलांनी माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या संपर्क कार्यालयासमोर एकत्र फटाक्याची आतिषबाजी करून मिठाई वाटून जल्लोष केला. गटनेते, आनंद चंदनशिवे यांच्या पुढाकारातून संपन्न केला.
तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस महिलांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर महिलांनी एकमेकांना लाडू भरवून आनंद व्यक्त केला. यावेळी फटाक्याची आतिषबाजी करून महाराष्ट्राच्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांच्या सन्मानार्थ केलेल्या कार्याचा गौरव करून जल्लोष साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक महापालिकेचे माजी गटनेते आनंद चंदनशिवे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन समाजिक कार्यकर्ते श्रीमंत जाधव यांनी व्यक्त केले.