मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर दौरा रद्द ; प्रकृती बिघडल्याने कार्यक्रम स्थगित !
मुख्यमंत्र्यांनी आगामी आठवड्यात पुन्हा येण्याचे सोलापूरकरांना दिले आश्वासन – मनीष काळजे
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. ८ ऑक्टोंबर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर दौरा पुन्हा एकदा रद्द झाला आहे. शिंदे यांची तब्येत बरी नसल्याने मुख्यमंत्र्यांचे आजचे सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर अत्यंत महत्वाची ठरणारी आजची मंत्रिमंडळाची बैठकही रद्द करावी लागली आहे, त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांचा सोलापूर दौराही पाचव्यांदा रद्द झाला आहे.
दरम्यान मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार महिला व बालविकास कल्याणमंत्री आदिती तटकरे यांच्यासह महायुतीचे दिग्गज नेत्यांची उपस्थिती राहणार होती. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोलापूर शहर जिल्ह्यातील सुमारे ४० हजाराहून अधिक महिलांची उपस्थिती होती. यासाठी राज्य शासनाने महिलांच्या प्रवासासाठी सुमारे ४०० हून अधिक एसटी बसेसची सोय करण्याचा आली होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत अचानक बिघडल्याने सर्व दौरे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनीष काळजे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.
तत्पूर्वी दुपारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते होणार होते. शिवसेनेचे कार्यकर्त्यांनी दिवसरात्र एक करून सर्व तयारी केली होती. तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्तीचे सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासनाने देखील जय्यत तयारी केली होती. संपूर्ण जिल्हा प्रशासन यासाठी कार्यरत होते. जिल्ह्यातील विविध तालुक्यातून एसटी महामंडळाच्या बसेस द्वारे महिलांना मैदान येथे आणले होते. परंतु एकनाथ शिंदे यांचा दौरा रद्द झाल्याचे समजताच शिंदे गटात निरुत्साह दिसून आला.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौरा रद्द केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोलापूर दौऱ्यावर येणार होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळ्यासाठी तसेच शिवसेना भवन या कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी सर्व जय्यत तयारी करण्यात आली होती. परंतु अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दौऱ्यावरून जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आम्ही मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनी वरून संपर्क साधून तब्येतीची काळजी घेण्याचे सांगितले. त्यांनी देखील सर्व बहिणींची विचारपूस करून दिलगिरी व्यक्त करत येत्या आठवड्यात पुन्हा मी येईन असे सांगितले आहे. त्यामुळे शहर व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी राग मानू नये.
– मनीष काळजे, जिल्हाप्रमुख शिवसेना सोलापूर.