मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार जाहीर…सांगोल्यात शहाजीबापू तर परांड्यात तानाजी सावंत फिक्स
सोलापूर शहर मध्य मात्र गुलदस्त्यात !
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. २२ ऑक्टोंबर – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करत आहे. सत्ताधारी भाजप पक्षांतर आपले उमेदवारांची यादी जाहीर करण्यास सुरुवात झाली आहे. सत्तेतील दुसरा पक्ष शिवसेना शिंदे गट यांची पहिली यादी जाहीर झाली आहे. या यादीमध्ये सुमारे ४५ उमेदवारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमधील बहुतांश उमेदवार हे स्टॅंडिंग आमदार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांवर विश्वास टाकलेला दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्या विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील तर परांड्यात मंत्री तानाजी सावंत यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.
दरम्यान जनतेचा सरकार वरील रोष पाहता मुख्यमंत्र्यांनी जोखीम घेणे टाळलेले दिसत आहे. एकीकडे भाजपने देखील सत्ताधारी आमदारांना स्थान दिले असताना, दुसरीकडे शिवसेनेने देखील आपल्या यादीमध्ये विद्यमान आमदारांना तिकीट दिलेले दिसत आहे.
शहर मध्य कोडे अद्यापही गुलदस्त्यात..
शिवसेना शिंदे गटासाठी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाची जागा करा किंवा मरा अशा स्थितीत आलेली दिसत आहे. ही जागा भाजपला सुटलेली आहे हे कळताच शिंदेसेनेतील सर्व शिवसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. मध्य साठी मोठ्या प्रमाणात वाटाघाटी सुरू असून त्यावर अद्यापही निर्णय झाला नाही असे सांगण्यात येत. जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे नाव नसल्याने शहर मध्याचे कोडे अद्यापही गुलदस्त्यातच दिसत आहे.