सोलापुरात राबवणार इचलकरंजी पॅटर्न ; उद्योगांचा साधणार चौफेर विकास

देवा भाऊ आले बाराबंदीच सर्वांचे मन जिंकले
सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१० जानेवारी
सोलापूरचे चित्र बदलायचा आहे, इचलकरंजी धरतीवर सोलापूरामधील यंत्रमाग हातमाग असे विविध उद्योगांना उभारी देऊन त्यांचा चौफेर विकास साधणार आहे अशी. केवळ महापौर घेण्यासाठी निवडणुकीत उतरलो नाही. अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या जाहीर सभेत बोलताना दिली.
सोलापूरचा चौफेर विकास करण्यासाठी महापालिकेच्या निवडणुकीत उतरलो आहे. सर्व उद्योगाला वेगवेगळ्या सवलती देऊ. अर्थकारणाला गती येईल, याबाबत इचलकरंजी पॅटर्न राबवू. हे सांगण्याकरता मी आलोय. केवळ आश्वासन देणारे लोक नाहीत. काम करणारे लोक आहोत. मागील विधानसभा निवडणुकीत पूर्ण बहुमताने आमच्या सरकार आलं एकट्या भाजपाला अभूतपूर्व असं 137 जागा मिळाल्या.
भाजपवाल्यांना जागा मिळाल्या, आता त्यांना लाडक्या बहिणींची आवश्यकता नाही. लाडकी बहीण योजना बंद करतील. परंतु लाडक्या बहिणींना एक वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला लाडके बहीण योजना बंद झाली नाही. तुम्हाला सांगतो जोपर्यंत तुमचा भाऊ देवा भाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. पालकमंत्री महोदय देशमुख मालक आमदार साहेब सर्वांना विनंती लाडक्या बहिणींना लखपती दीदी करा मोदीजींनी लाडक्या बहिणींकरिता लखपती दीदीचा योजना केली आहे. पुढच्या चार महिन्यात हा आकडा एक कोटीपर्यंत जाणार आहे. असेही ते म्हणाले,
महापालिकेत सोलापूरला येईल तेव्हा महापौरांना नगरसेवकांना आमदारांना काय काम झाली हे विचारेन. माझ्या सोलापूर मधल्या किती लाडक्या बहिणींना किती लखपती केलं याचा मला हिशोब द्या. काय पाहिजे ते मागा. लाडक्या बहिणी पुढील अर्थव्यवस्थेत मोठी भूमिका बजावणार आहे. त्यामुळे आपला आशीर्वाद हवा आहे. सोलापूरकरांचे भाजपवर प्रेम आहे. कमळ लक्ष्मीचं वाहन आहे. समृद्धीचे निशाण आहे. कमळ चिखलात फुलते, त्यामुळे ते स्वच्छ आहे. पंधरा तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या सोळा तारखेला पाच वर्ष तुमची काळजी हा देव भाऊ घेईल हा विश्वास देतो जय हिंद जय महाराष्ट्र….
देवा भाऊ आले बाराबंदीच सर्वांचे मन जिंकले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूरच्या बाहेर सभेत बाराबंदी पोशाख परिधान करून आले होते. तत्पूर्वी त्यांनी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन पूजा केली. भाषणाच्या सुरुवातीला ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या घोषणा करून उपस्थित जनसमुदायाला आपलेसे केले.