पक्ष प्रवेशानंतर कोठे समर्थकांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट  ; प्रथमेश कोठे यांनी यासाठी मानले देवेंद्र फडणवीस यांचे आभार

पक्ष प्रवेशानंतर कोठे समर्थकांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट 

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.११ नोव्हेंबर 

माजी महापौर स्व. महेश अण्णा कोठे यांच्या गटातील माजी नगरसेवक व सोलापुरातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी  भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे व युवा नेते माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले.

 याप्रसंगी दिवंगत महेश कोठे यांच्याशी आलेल्या स्नेहपूर्ण संबंधांना उजाळा मिळाला. जानेवारी २०२५ मध्ये प्रयागराज येथे महेश कोठे यांचे निधन झाल्यानंतर केवळ फडणवीस यांच्या सहकार्यामुळेच पार्थिव सोलापूरला आणणे शक्य झाले, त्याबद्दल मनापासून आभार मानण्यासाठी आलो असल्याचे प्रथमेश कोठे यांनी सांगितले.

 ही मदत आयुष्यभर विसरता येणार नसल्याचा उल्लेख त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील महेश कोठे यांच्याशी पूर्वी झालेल्या भेटीचा संदर्भ देत त्यांच्या कार्यशैलीचा गौरव केला.

या भेटीप्रसंगी स्थायी समितीचे माजी सभापती विनायक कोंड्याल, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर, माजी नगरसेविका कुमुद अंकाराम, माजी नगरसेवक विठ्ठल कोटा, माजी नगरसेवक शशिकांत कैंची, परिवहन समितीचे माजी सदस्य परशुराम भिसे, संतोष सोमा, जोशी समाज शहर अध्यक्ष युवराज सरवदे, अक्षय वाकसे, तुषार पवार, वासुदेव यलदंडी, दिनेश गुर्रम, दीपक राजुल, वैभव दोशी, भीमाशंकर अंकाराम, सागर भोसले, स्वप्नील वाघमारे, अमित अंकाराम, सुमीत अंकाराम, आकाश भोसले, भोजराज माने, अमित जाधव, अमर शिंदे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *