मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोचले थेट बाधितांच्या बांधावर 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोचले थेट बाधितांच्या बांधावर 

सोलापुरातील महापुरानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 

शेती शिवाराची, घरादारांची अन् वाड्यावस्त्यांची केली आखों देखा पाहणी 

  • राज्यशासन पूरग्रस्तांच्या पाठीशी बाधितांना करणार सर्वोतोपरी मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन 
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महापुराने बाधित झालेल्या माढा तालुक्यातील गावांची भेट घेऊन घेतली माहिती
  • अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या प्रत्येक नागरिकांना मदत करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
  • मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून दोन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर प्रतिनिधी 

सोलापुर जिल्ह्यात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे शेतीचे घरादाराचे मोठे नुकसान झाले. याच नुकसानीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विमानाने आज सोलापूर दौऱ्यावर आले होते. सोलापुर विमानतळावर त्यांचे स्वागत आमदार सुभाष देशमुख विजयकुमार देशमुख एम.राजकुमार भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी केले. तद्नंतर त्यांनी मोटारीने त्यांनी सोलापुर जिल्ह्यातील बाधित माढा तालुक्यांची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या बांधावर तसेच घरामध्ये जाऊन बाधित शेतकऱ्यांची विचारपूस केली. तसेच विविध उपयोजनात्मक कारवाईसाठी प्रशासनाला सूचना दिल्या.

    यावेळी सोलापुर जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेती पिकांचे जनावरांचे घरांचे व्यावसायिकांचे खूप मोठे नुकसान झालेले असून पूरग्रस्त नागरिकांनी अशा संकटाच्या काळात धीर धरावा, राज्य शासन संकटकाळात पूरग्रस्तांच्या पूर्णपणे पाठीशी असून नागरिकांना सर्वोतोपरी मदत केली जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

     दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील निमगाव तसेच दारफळ सीना या गावाला भेट देऊन पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली, त्यांनी दोन्ही गावातील नागरिकांशी संवाद साधला. याप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजीत मोहिते पाटील, आमदार अभिजीत पाटील, विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते, जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आदी उपस्थित होते.

        प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढा तालुक्यातील निमगाव येथे नुकसानीची पाहणी केली आणि नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या. या संकटातून बाहेर पडण्यासाठी नागरिकांना आवश्यक मदत करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून दोन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अतिवृष्टी व पूर आल्यामुळे ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या सर्वांना शासनाकडून मदत दिली जाणार आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून दोन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापुढेही पूरग्रस्तांना आवश्यक मदत देण्यासाठी शासन हात आखडता घेणार नाही. शासन टंचाई कळत ज्या निकषाप्रमाणे मदत करते त्याप्रमाणेच अती पावसात, ओल्या दुष्काळात ही मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

शेतीसाठी अन्नधान्यासाठी आणि घरांसाठी वेगवेगळी मदत 

जिल्ह्यातील विविध गावात पुरामुळे मोठे  नुकसान झाले असून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने नदीने पात्र बदलले आणि  गावाचा मोठा भाग पाण्यात गेला. तसेच लोकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे घरांचे, अन्नधान्याचे नुकसान झाले आहे. शेती, जनावरांचे नुकसान झाले आहे. शासन शेती, घरादारांकरिता, अन्नधान्य आदींसाठी मदत करणार असून रस्ते, शाळा, शेतरस्ते, वीजव्यवस्था आदी सुविधांसाठीही आवश्यक ती सर्व मदत करणार आहे. व्यावसायिकांनाही नुकसानीसाठी स्वतंत्र मदत करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *