मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आयटी पार्कची घोषणा… देवेंद्र दादांच्या मागणीला आले यश… निवेदनाद्वारे केली होती मागणी

सोलापुरात लवकरच उभारणार आयटी पार्क… पालकमंत्र्यांसह आमदार देवेंद्र कोठे यांना मुख्यमंत्र्यांच्या सूचना

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर प्रतिनिधी

आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरचा झंजावती दौरा करत, सदनिकांच्या वितरण समारंभात थेट आयटी पार्क ची घोषणा केली आहे. त्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्यावर जागा शोधण्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे लवकरच सोलापूरकरांचे आयटीचे स्वप्न लवकरच सातत्यात उतरणार आहे.

दरम्यान, यासंदर्भात आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी पश्चिम महाराष्ट्रातल्या आमदारांची बैठक झाली, त्यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोलापुरात उद्योग( एमआयडीसी) क्षेत्रातून आयटी पार्क मंजूर करण्यासाठी मागणी केली होती. यासंदर्भात आपणास १५ जुलै २०२५ रोजी लेखी निवेदन सुद्धा दिले होते.

आज सोलापुरात संपन्न झालेल्या कार्यक्रमात आपण एमआयडीसी (उद्योग) विभागाच्या माध्यमातून आयटी पार्क देण्याची घोषणा केली. सोलापूरच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत क्रांतिकारक ठरणारा आहे. सोलापूरच्या तरुणांच्या हाताला सोलापुरात काम मिळेल, सोलापूरचा उद्योग व्यवसाय भरभराटीला येईल आणि या निर्णयामुळे सोलापूरची सर्वांगीण प्रगती साधली जाईल. आपल्या घोषणेमुळे माझ्या पाठपुराव्याला यश मिळाल्याचा आनंद होतोय. आपले त्रिवार हार्दिक आभार !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *