स्वच्छता ही सेवा पंधरवडा उत्साहात साजरा..! महापालिका आणि भारत पेट्रोलियम यांचा उपक्रम…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. ०२ ऑक्टोंबर – गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकार यांचे निर्देशनानुसार राष्ट्रपिता महात्मा गाधीजींना त्यांच्या जयंती निमित्त आदरांजली अपर्ण करण्यासाठी ०२ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याची पूर्वतयारी म्हणून, स्वच्छ भारतासाठी स्वयंप्रेरणा आणि सामूहिक कृतीला बळकटी देण्यासाठी २०१७ पासून स्वच्छता ही सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे. दि. १७ सप्टेंबर, २०२४ ते दि.०२ ऑक्टोबर, दरम्यान स्वच्छता ही सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला.
त्या अनुषंगाने भारत पेट्रोलियम यांच्या यांच्या सौजन्याने महापालिकेत भव्य आरोग्य शिबिर घेण्यात आले. या आरोग्य शिबिराचे उद्घाटन महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे तसेच भारत पेट्रोलियमचे मॅनेजर टेरिटरी मॅनेजर सौरभ शर्मा, जयश्री बोरकर यांच्याहस्ते करण्यात आले. त्यानंतर महापालिकेच्या परिसरामध्ये एक पेड माँ के नाम वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
याप्रसंगी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले,डॉ सिद्धांत गांधी, कर्डियोलोजिस्ट डॉ.रुची गांधी, विद्याधर हतागळे,यावेळी पर्यावरण व्यवस्थापक स्वप्निल सोलंकर उद्यान अधीक्षक किरण जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.*स्वच्छता ही सेवा हा उपक्रम *महात्मा गांधी जयंती निमित्त आज भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन* यांच्या सौजन्याने सोलापूर महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी सोलापूर महानगरपालिका कार्यालय, येथे आरोग्य तपासणी या शिबिरामध्ये रक्तदाब, रक्तातील साखर, हाडांचा खनिज घनता आणि ईसीजी चाचण्यांसह व्यापक आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. तसेच, डोळ्यांची तपासणी देखील करण्यात आली आणि ज्यांना नंबर लागले आहेत अशा कर्मचाऱ्यांना मोफत चष्मे देण्यात येणार आहेत.सोलापूर स्वच्छ ठेवण्यासाठी त्यांच्या समर्पणाबद्दल कृतज्ञतेच्या प्रतीक म्हणून सर्व सफाई कर्मचाऱ्यांना जूट बॅग देऊन सन्मानित करण्यात आले, ज्याद्वारे त्यांच्या कठोर परिश्रमाचे कौतुक करत, प्लास्टिक पिशव्यांना नकार देऊन पर्यावरणपूरक पर्याय वापरण्याचा संदेश दिला गेला. या शिबिराचा शंभरहून अधिक सफाई कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला.