सोलापूर व्हिजन
सोलापूर दिनांक :- लोकसभेत प्रणिती शिंदे यांना महाविकास आघाडीतील पक्षांनी प्रामाणिक काम केल्यानेच यश, कार्यकर्त्यानी पायात पाय घालून पाडण्यापेक्षा, हातात हात घेऊन काम करावे….चेतन नरोटे यांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे.
लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आता लगेच विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत, त्या दृष्टीने सर्व पक्षाकडून मोर्चे बांधणी देखील करण्यात येत आहे, शहरातील महाविकास आघाडीमध्ये मात्र गेल्या काही दिवसांपासून शहर उत्तर या जागेवरून मात्र मतमतांतर दिसत आहे, काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे सुनील रसाळे यांनी सोलापूर शहर उत्तर विधानसभेची जागा काँग्रेसला मिळावी याबाबत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना पत्र दिले होते, त्यानंतर शहर उत्तर वर आपला हक्क सांगणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातील काही नेतेमंडळी मात्र नाराज झाली होती, परंतु या सर्व प्रकरणाबाबत काँग्रेस चे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी आपले मौन सोडले असून, लोकसभेला प्रणिती शिंदे यांना महाविकास आघाडीतील सर्व मित्र पक्षाने प्रामाणिक मदत केल्याने यश मिळाले याआहे, कोणती जागा कोणाला मिळेल हा निर्णय वरिष्ठ स्तरावर होणार असून, कार्यकर्त्यानी पायात पाय घालून पाडण्यापेक्षा हातात हात घेऊन कामाला लागावे असा सल्ला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिला आहे