मुख्यमंत्र्यांचा झंजावती दौरा…. सेनेचे बापू आले प्रकाश झोतात , तर मग अण्णा गेले कुठे .. राजकीय वर्तुळात चर्चेला आले उधाण…..
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि १५ जुलै – दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणाऱ्या तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी संबंध भारतामधून वारकरी भाविक पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. आषाढी दिवशी जणू वारकऱ्यांचा सागरच पंढरपुरात जमतो असे नयनरम्य चित्र पहावयास मिळते. याच आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झंजावती पहाणी दौऱ्यासाठी पंढरपुरात दाखल झाले होते…
यावेळी त्यांनी वारकऱ्यांना प्रशासनातर्फे उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विविध सोयी सुविधा आणि विविध नियोजनाची पाहणी केली. वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सरकार आणि जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीन असल्याचे दिसून आले, या पाहणी दौऱ्यात मंत्री तानाजी सावंत मुख्यमंत्र्यांच्या सोबत होते. तसेच यावेळी त्यांच्यासमवेत राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत, पंढरपूर मंगळवेढयाचे आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, सीईओ मनीषा आव्हाळे यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेतेमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोलापूर शहरातील जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे हे देखील मुख्यमंत्र्यांच्या मागे सावलीप्रमाणे दिसून आले. एरव्ही एकनाथ शिंदे यांची सावली म्हणून मनीष अण्णा काळजे यांना पाहिले जायचे, परंतु सावली बदलली की काय असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे ?
दरम्यान गतवर्षी आषाढी वारीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असाच धावता आणि झंजावती दौरा केला होता. या दौऱ्यामुळे प्रशासनाची पुरेपूर दमछाक झाली होती. मात्र यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आषाढीच्या अगोदर येणार असल्याचे पूर्वसुचित असल्याने प्रशासन यासाठी तयार होते. जेव्हा मुख्यमंत्री बारामती वरून पंढरपूरकडे दाखल झाले त्यावेळेस मंत्री तानाजी सावंत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे आवर्जून जिल्हाप्रमुख अमोल शिंदे उपस्थित होते. संबंध पंढरपूर दौऱ्यामध्ये अमोल शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे होते. प्रत्येक पाहणी वेळी तसेच विविध ठिकाणी त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली.
दरम्यान सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी दिलेल्या शिवाजी सावंत यांच्यासोबत कायमच अमोल शिंदे पाहायला मिळतात. यापूर्वी अमोल बापू सोबत दिसणारे सोलापुरातील बरेच नेते आता दुसऱ्या गटात फिरू लागल्याचे चित्र आहे, सावंत यांच्या सोबत असल्याने अमोल बापू यांना मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात चांगली ट्रीटमेंट मिळताना दिसून येते. मुख्यमंत्र्यांच्या संपूर्ण दौऱ्यात अमोल शिंदे हे त्यांच्या जवळ पाहायला मिळाले. अमोल बापू शिंदे यांच्या उपस्थितीत मनीष अण्णा काळजे यांची फोटोमध्ये उपस्थिती दिसून आली नाही. मनीष अण्णा काळजे यांनी स्वतःहून येण्याचे टाळले का मुख्यमंत्री एकनाथ भाईंनी अण्णांना दूर करून बापूंना जवळ केले का ? असे तर्कवितर्क राजकीय वर्तुळात लढवले जात आहेत. एकंदर यंदाची आषाढीवारी राजकीय वेगवेगळ्या घडामोडींची नांदी ठरत आहे.