मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बारामती व्हाया पंढरपूर दौरा….
सोलापूर शहरात आगमन नाही..
सोलापूर व्हिजन
सोलापूर, दि १३ – राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे दिनांक १४ जुलै २०२४ रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. अचानक असलेला त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार दिनांक १४ जुलै २०२४ रोजी सकाळी दहा वाजता बारामती विमानतळ जिल्हा पुणे येथे आगमन. बारामती येथून शासकीय मोटारीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर श्री क्षेत्र पंढरपूर कडे प्रयाण.
दुपारी १२.०० वाजता आषाढी एकादशी वारीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आणि पाहणी दौरा. दुपारी ३.०० वाजता पंढरपूर येथून बारामती विमानतळ कडे प्रयाण करतील. गेल्यावर्षी देखील अशाच पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरचा अचानक दौरा केला होता. यावर्षी देखील सदरचा पंढरपूर दौरा निश्चित करण्यात आला आहे. परंतु सोलापूरात न येताच ते पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहेत.