लाडक्या बहिणीमुळे अंगणवाडी सेविका तणावात ; लाभार्थी महिलांची वाढली अरेरावी…

लाडक्या बहिणीमुळे अंगणवाडी सेविका तणावात ; लाभार्थी महिलांची वाढली अरेरावी…

महा-ई-सेवा केंद्राकडे काम सोपवण्याची अंगणवाडी सेविकांकडून होतीय मागणी…

सोलापूर व्हिजन

सोलापूर दि १६ जुलै – राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून लाडकी बहीण योजनेकडे बघितले जात आहे. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये सदरची योजना जाहीर करताच महिलांमध्ये उत्साह निर्माण झाला. परंतु सदरची योजना जाहीर करण्याअगोदर त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करावयाची आहे. याचा कोणताच विचार न करता आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजना जाहीर केली का असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला गेला.

                       मात्र त्याला आता मूर्त स्वरूप येत असल्याचे दिसत आहे. कारण अर्ज भरतेवेळी अनेक अडचणी निर्माण होत आहेत. सक्षम ॲप नसल्याने अंगणवाडी सेविकांना तणावात राहावे लागत आहे. लाभार्थी महिला कधीही येऊ नये अर्ज भरा, तुम्हाला अर्ज भरावाच लागेल अशी भाषा बोलत आहेत. त्यामुळे अगोदरच तणावात असलेल्या अंगणवाडी सेविका आता लाभार्थी महिलांच्या दबावात आलेल्या दिसत आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना हे काम नको अशी कुण कुण आता सुरू झाली आहे. नारीशक्ती एप्लीकेशन हे सुरळीत आणि व्यवस्थितपणे सुरू राहत नाही. एक अर्ज भरण्यासाठी सुमारे एक तासाहून अधिकचा वेळ लागत आहे. कधी कधी तर दिवसभर बसून देखील अर्ज भरला जात नाही. एकीकडे अंगणवाडीचे रोजचे काम, आणि दुसरीकडे लाडकी बहिणीचा अर्ज हे अतिरिक्त काम अंगणवाडी सेविकांच्या माथी मारल्याने

सेविकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

               रोजच्या दैनंदिन कामामध्येच दिवस जातो, उरलेल्या दिवसात योजनेचे अर्ज भरताना नाकीनऊ येत आहे. सरकारने या योजनेचे काम सेतू किंवा महा ई सेवा केंद्र यांच्याकडे सुपूर्द करावे अशी मागणी आता अंगणवाडी सेविकांमधून जोर धरू लागलेली आहे. एप्लीकेशन सुरळीत आणि व्यवस्थित सुरू राहत नसल्याने अंगणवाडी सेविकांकडे अर्जाचे गठ्ठे येऊन पडलेले आहेत. हे गठ्ठे ऑफलाइन पद्धतीने भरलेले आहेत.  ते पुन्हा ऑनलाईन स्वरूपात भरावयाचे असल्याने सदरचे गठ्ठे पाहून अंगणवाडी सेविकांना धडकी भरू लागलेली आहे, वास्तव समोर आले आहे. याच धडकीमुळे सोलापूर जिल्ह्यातील एका अंगणवाडी सेविकेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी संघटना देखील आक्रमक भूमिकेत दिसत आहे.

अगोदरच अंगणवाडीचे दररोजचे काम , वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सर्वे त्यात आणखीन लाडकी बहीण योजना सुरू केली. अंगणवाडी सेविकांवर या अतिरिक्त कामाच्या बोजामुळे ताण-तणाव वाढलेला आहे. यातूनच एका सेविकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदरचे काम सेतू केंद्र अथवा महा-ई-सेवा केंद्रकडे सोपवावे अशी आमची मागणी आहे. 

– व्यथित अंगणवाडी सेविका 

हृदयविकाराच्या झटकेने मोहोळ तालुक्यातील अंगणवाडी सेविकेचे निधन…

नारी शक्ती दूत ॲप वरून लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी महिलांची वाढती गर्दी आणि कामाचा ताण यामुळे मोहोळ तालुक्यातील देगाव इथल्या अंगणवाडी क्रमांक एक इथल्या नगरसेविका सुरेखा अतकरे या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्युमुखी पडल्या, अंगणवाडी सेविकांना अगोदरच विविध प्रकारचे सर्व्हे , रोजची दैनंदिन कामे आदीं कामांचा  भरपूर  ताण असताना लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याचे अतिरिक्त काम दिल्याने त्यांच्यावर कामाचा आणखीन दबाव आणि ताण वाढलेला आहे.

अंगणवाडी कर्मचारी संघटना आक्रमक ; वारसांना मदत द्या अन्यथा राज्यभर वणवा ; 

अंगणवाडी कर्मचार्‍यांची मानधनवाढ, पेन्शन व इतर मागण्यांचा विचार केला नाही तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ऑनलाइन अर्ज भरणार नाही. केवळ ऑफलाइन अर्ज भरून प्रकल्प कार्यालयात जमा करू. तसेच ऑनलाइन अर्ज भरण्याचा मनस्ताप झाल्याने तुटपूंज्या मानधनावर काम करणार्‍या मोहोळ तालुक्यातील देगाव (वा) येथील अंगणवाडी सेविकेचा मृत्यू झाला. या अंगणवाडी सेविकेच्या कुटूंबियांना सरकारने तत्काळ भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अन्यथा 18 जुलैच्या मोर्चानंतर आंदोलनाचा वणवा राज्यभर पेटवू, असा इशारा देण्यात आला आहे. 

– सूर्यमणी गायकवाड , राज्य कार्याध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी संघटना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *